मुंबई: प्रतिनिधी आगामी वर्षात मुंबईसह १३ शहरातील महापालिका, नगरपंचायती निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असून …
Read More »प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी राज्यस्तरीय वाणिज्य उत्सवाची सांगता- निर्यात आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग संचालनालय आणि केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या ‘वाणिज्य उत्सवाची सांगता झाली. यापुढे प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून जिल्हा निहाय निर्यात आराखडा तयार करण्याची …
Read More »क्रेडिट, डेबिट कार्ड वापरणाऱ्यांनो १ ऑक्टोबरपासून ‘ही’ सुविधा होणार बंद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नवा नियम होणार लागू
मुंबई : प्रतिनिधी तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरत असाल तर १ ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण या तारखेपासून तुमच्या बँकिंग व्यवहारांबाबत नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम माहीत करून घेतला नाही तर तुम्हाला नाहक भुर्दंड पडू शकतो.बँकिंग व्यवहारांच्या नवीन नियमानुसार, जर तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे कोणत्याही प्रीमियम, बिल किंवा इतर पेमेंटसाठी ऑटो डेबिटची सुविधा सक्रिय केली असेल, तर रक्कम कापण्यापूर्वी बँकेला तुमची संमती घ्यावी लागेल. बँका केवळ स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच्या आधारे तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या …
Read More »महिलांप्रश्नी आता भाजपाच्या महिला आमदारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार नसल्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच प्रश्नी दिल्लीसह भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह …
Read More »पीएमसीसह या २१ बँकांच्या खातेदारांना मिळणार ५ लाख रुपये २९ नोव्हेंबर पर्यंत मिळणार पैसे
मुंबई : प्रतिनिधी २१ बुडीत बँकांच्या ग्राहकांना या वर्षी डिसेंबरपर्यंत पैसे मिळू शकतील. ठेवींवर सरकारच्या असलेल्या हमीखाली हे पैसे खातेदारांना मिळतील. या अंतर्गत खातेधारकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. गेल्या महिन्यात संसदेने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२१ मंजूर केले. यानुसार, आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत. बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवल्या जातात, त्या विम्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की जर बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर खातेदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. अलीकडच्या काळात, पीएमसीसह एकूण २१ सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे. बँकांमधील ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. डीआयसीजीसीने म्हटले आहे की, बँकेच्या विमा उतरवलेल्या ठेवींच्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात. डीआयसीजीसीने म्हटले आहे की एकूण २१ बँका त्याच्या कक्षेत आहेत. पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे. काही आवश्यक सूचना त्या बँकांना दिल्या आहेत. बँकांना ४५ दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील. त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर पुढील ४५ दिवसात बँकेला पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील. याचा अर्थ २९ नोव्हेंबरपर्यंत बँकेच्या दाव्यांची छाननी केली जाईल. DICGC सुधारणा विधेयक ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेत मंजूर झाले. यामध्ये बँक ठेवींवरील विमाधारक हमी ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या स्थगिती कालावधीनंतर ९० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजेत. पूर्वी विम्याची रक्कम एक लाख रुपये असायची. या २१ बँकाच्या ठेवीदारांना मिळेल भरपाई १) अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ २) बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र …
Read More »महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही …
Read More »सावधान ! तुमचा फोन खूप लवकर डिस्चार्ज होतोय का? असू शकतो व्हायरस हँकिंग टाळण्यासाठी हे काम त्वरित करा
मुंबई: प्रतिनिधी आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाऊंट देखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष …
Read More »एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ
मुंबई: प्रतिनिधी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार …
Read More »“सिर्फ एक” चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात संपन्न प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात
पुणे: प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत गुन्हेगारीकडे पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात …
Read More »निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर …
Read More »
Marathi e-Batmya