Breaking News

अखेर सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहिर ! या अभ्यासक्रमांसाठी होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी परिक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने या परिक्षा घेण्यासंबधीचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व …

Read More »

दरेकरांचे मलिकांना प्रतित्तुर, आधी चोर्‍या, आता बहाणे! काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? दरेकरांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा उपरोधिक टोला लगावत मलिक यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतित्तुर दिले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांनी …

Read More »

फडणवीसबरोबरील आयपीएस अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला. ते सह्याद्री अतिथीगृहात  आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही …

Read More »

सरकार जाणूनबुजून करतंय असं वाटतंय तर हायकोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करा मंत्री नवाब मलिक यांचे विरोधकांना आव्हान

मुंबई: प्रतिनिधी कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील, परंतु ज्यांना राज्य सरकार हे जाणूनबुजून करतंय असं वाटतंय त्यांनी विविध हायकोर्टाचे आदेश आलेत त्याचा अभ्यास करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला. राज्यात …

Read More »

कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? एसआयटी मार्फत चौकशीची आमदार आशिष शेलार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा सवाल करत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी करावी अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली …

Read More »

कोंकणवासियांना खुषखबरः वाहनांना टोलमाफी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील सहकारी पक्षांबरोबरच विरोधकांना केले हे आवाहन जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या …

Read More »

गायब अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भा जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये …

Read More »

“त्या” युवकांचे ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख पुरस्कार देऊन गौरव करणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे …

Read More »

पवारांनी कानपिचक्या देत केंद्राच्या कृषी धोरणाबाबत म्हणाले… आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दरम्यान एकमेंकाना “पाठीत खंजीर खुपसला”, “कोथळा बाहेर काढणारे” अशा शब्दांचा वापर सुरु झाल्या आहेत. त्यातच काल जुन्नर मध्ये संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर टोकाची टीका …

Read More »