पुणे : प्रतिनिधी राज्यातील एक मंत्री ईडीच्या रडार आहे, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा देवून बाहेर फिरतोय, एकजण करूणा मुंडे प्रकरणात मान खाली घालून फिरतोय, एका मंत्र्याबद्दल लूक ऑऊट नोटीस जारी झालीय, तर एकजण ईडी कारवाईपासून पळतोय, तर या सर्वांचे जे सगळं चालवितात त्या वाजेंद्र राऊतांचा बंगला पाडण्यात …
Read More »अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई… अन्यथा कधीच बाहेर येणार नाही ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करून या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आपण टाकतो आहे. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघातकींची सोबत नाही: राऊत तुमच्या दंडात ती ताकद नाही हम किसेको टोकेंगे नही अगर टोका तो छोडेगें नही शिवसेनेला पाटलांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी मोदींच्या नावावर मते मागूनही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्यांना सोबत न घेता भाजपा एकट्याने मित्रपक्षासोबत निवडणूका लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विश्वासघातकी म्हणून टीका करत संजय राऊत हे जी भाषा वापरत आहेत त्या पध्दतीचे शस्त्र …
Read More »शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, मी दिलेला शब्द पाळला राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर पवारांची स्पष्टोक्ती
पुणे : प्रतिनिधी राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला असून मी दिलेला शब्द पाळला …
Read More »अतुल भातखळकर बेफाम खोटे बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र उद्योगस्नेही मानकात अधोगती-सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही ( Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर …
Read More »राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना महागाईचं रिटर्न गिफ्ट महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात महागाई विरोधात आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी देशातील आपल्या सर्व भगिनींना मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवत रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या आज पाठवत पुणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही… नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे करत आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि …
Read More »ओबीसीप्रश्नी पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मात्र निशाणा या मंत्र्यांवर ओबीसींसाठींच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शोधासाठी टास्कफोर्स स्थापणार का? मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळ उपस्थिती स्थापन केली. या समितीची स्थापना होवून एक वर्ष झाला असून या वर्षभरात ही समितीचं अदृष्य होवून हरवली असल्याने या उपसमितीच्या शोधासाठी एखाद्या टास्क फोर्सची स्थापना करणार की आम्ही प्रत्येक पोलिस ठाण्यात तशी तक्रार …
Read More »चिखलातून… मोटारसायकलवरुन प्रवास करत पाझर तलावाची पाटलांनी केली पाहणी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य; जयंत पाटलांचे आश्वासन
चाळीसगांव : प्रतिनिधी फुटलेल्या पाझर तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नसताना चक्क कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरुन तीन किलोमीटरचा प्रवास करत आणि चिखल तुडवत अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्याचे जलसंपदा …
Read More »पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यातील २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यातील ज्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही त्यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका …
Read More »
Marathi e-Batmya