Breaking News

नारायण राणेंचा पुन्हा सूचक शब्दातून इशारा, माझं कोणीच काही करु शकत नाही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगत त्यांना एकटा पुरून उरलोय

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जामिनावर बाहेर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता पुन्हा थेट इशारा दिला. माझं कोणीच काही करू शकत नाही. तुम्हालाही मुलं-बाळं नाहीत का असे वक्तव्य करत मी तुम्हा …

Read More »

राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक, तरीही त्यांची जन आशिर्वाद यात्रा होणारच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले. केंद्रीय …

Read More »

भारतातील सामाजिक लढ्यातील शिलेदार डॉ. ऑम्व्हेट यांचे निधन सांगलीतील कासेगांव येथे अंत्यसंस्कार

सांगली-मुंबई: प्रतिनिधी अमेरिकेसारख्या देशात जन्माला येवून ही तेथील भौतिक आणि सधनतेचा कोणताही मोहात न अडकता भारतातील जातीय-वर्ग लढ्यातील एक बिनीची शिलेदार म्हणून काम करण्याचे धाडस करणाऱ्या डॉ.गेल ऑम्व्हेट यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर कासेगांव येथील क्रांतिकारक पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतातील अनेकांना …

Read More »

नारायण राणेंना आधी न्यायालयीन कोठडी नंतर अटींवर जामीन मंजूर जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान दिला निर्णय

महाड: प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी गोळवली येथून जेवत असताना अटक करून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशीरा महाड येथील सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यावेळी सुरूवातीला राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र १५ मिनिटाच्या अंतरानंतर …

Read More »

बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन …

Read More »

राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य समजावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान …

Read More »

हिंदूंच्या प्रेतांची गंगा नदीत अवहेलना करणाऱ्यांना हिंदूचे नाव घेण्याचा अधिकार नाही ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान नांदेडमध्ये संपन्न

नांदेड: प्रतिनिधी देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून ते मोठ्या कष्टाने मिळाले आहे, अनेकांनी त्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेस पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवणारे राज्य असून स्वातंत्र्य चळवळीतही ‘भारत छोडो’सह अनेक महत्वाच्या आंदोलनाची पायाभरणी महाराष्ट्रात झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले …

Read More »

लोकसंख्या, प्रभाग रचना नकाशे पालिकेने मागविले जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

सातारा : प्रतिनिधी सातारा पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व लोकसंख्या वाढीचा अचूक तपशील जनगणना आयोगाकडून मागविला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पालिकेने निवडणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी झाली. मात्र बैठकीत …

Read More »

नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिकमध्ये कोणते गुन्हे दाखलः जाणून घ्या शहर शिवसेनेच्या वतीने महामार्गावर निदर्शने

नाशिक -महाडः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले ते जाणून घेवूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याने महाडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त …

Read More »

केंद्रीय मंत्री राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेले

संगमेश्वरः प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. भाजपाचे आमदार तथा राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना संगमेश्वरमध्ये प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केली. मात्र त्यांचे दुसरे सुपुत्र निलेश राणे …

Read More »