Breaking News

बीडीडी चाळकऱ्यांसाठी खुषखबर: पुनर्विकसीत सदनिका घेताना फक्त हजार रूपये भरा नाम मात्र मुद्रांक शुल्क आकरण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ऐन शहरातील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडीमधील बीडीडीच्या २०७ चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास झालेल्या सदनिका पुन्हा मुळ चाळकऱ्यांना देताना फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे फक्त एक हजार रूपयात ही ५०० चौरस फुटाची सदनिका मुळ चाळकऱ्यांना …

Read More »

मराठवाड्याच्या विकासासाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी, विभागप्रमुखांची बैठक केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

नांदेड : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अर्थ राज्यमंत्रिपद दिले आहे. मी मराठवाड्यातील लातूर येथील भूमिपुत्र असून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. ते जन आशीर्वाद यात्रेनिमित्त …

Read More »

खुषखबर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भरतीची जाहिरात लवकरच प्रसिध्द प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग ४ ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »

तळीये गावातील दरडग्रस्तांसाठी गुजरातमधून घरे येणार सातही वाड्यांमधील २६१ घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार - गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे कोकणातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी होत गावच गायब झाले. तसेच सात वस्त्यांमधील घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे त्या सर्व बाधितांना घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र ही सर्व घरे सध्या गुजरातमधून तयार होवून येणार असल्याची माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

संत गाडगेबाबांच्या विचारसरणीवर काम करीत राहणार प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्यशासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्यावतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री …

Read More »

आणि लसीच्या सुरक्षित पुरवठ्यासाठी सीरमने ही कंपनीच खरेदी केली सीरमचे मुख्याधिकारी अदार पुनावाला यांची ट्विटरद्वारे माहिती

पुणे-जर्मनी : प्रतिनिधी ऑक्सफर्डच्या फॉर्म्युल्यावर तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड या कोरोनारोधक लसीचा पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित करता यावा यासाठी जर्मनस्थित SCHOTT AG Kaisha या कंपनीचे ५० टक्के समभाग सीरम इन्स्टीट्युटने खरेदी केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यामुळे यापुढे सीरम या SCHOTT AG कंपनीची भागीदार म्हणून …

Read More »

एमटीडीसीच्या रूम्स आता मेक माय ट्रीप, स्काय-हायसह वरुन बुक करता येणार एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड पर्यटक निवास, गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि …

Read More »

फडणवीस म्हणाले, पवारांना हे चांगलं माहित आहे…. ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकार चालढकल करतयं

पुणे : प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपूर्ण देशातून गेलेले नाही तर ते फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यातील गेलेले आहे. हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. मात्र ओबीसींना आगामी महापालिका निवडणूका, नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होई पर्यत आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे ते पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली …

Read More »