Breaking News

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

मुंबई: प्रतिनिधी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. या पत्रात देवेंद्र …

Read More »

राज्यात १८ ते २८ टक्के कराच्या वस्तुंची विक्री झाली तर आर्थिक स्थैर्य करवसुली यंत्रणेकडून माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनची घोषणा केली. मात्र पुन्हा विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने आर्थिक उलाढालीची गती पुन्हा मंदावली. राज्यातील बाजारपेठा पुन्हा सुरु होवून १८ ते २८ टक्केवारीत असलेल्या वस्तुंची विक्री …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला स्थगिती नाही मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम …

Read More »

राज्यातील तरूणांना प्रशिक्षण आणि रोजगार देणार जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्याचा संकल्प - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी नोकरी इच्छूक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता राज्यभरात ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत.  शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छूक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाईन समुपदेशन करण्यात येत आहे. आता लवकरच दहावी …

Read More »

कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर …

Read More »

या भागातील वीज ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार माफ ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले. अजूनही काही ठिकाणी काम सुरु आहे. वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या केली. मंगळवारी मंत्रालयात …

Read More »

राजस्थानमधील राजकिय पेचामुळे रखडली नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती पटोले, चव्हाण आणि सातव यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोखल्या गेलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीही लवकरच होणार होती. मात्र राजस्थानात राजकिय पेच निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड रखडल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. साधारणत: पाच वर्षापूर्वी सत्तेतून पायाउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक …

Read More »

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले. यासंदर्भात महाराष्ट्र …

Read More »

शिवसेनेच्या दलित माजी आमदाराला जातीवाचक शिव्या देत मारहाण १० दिवसानंतर अॅट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल

सातारा-मुंबई: राजू झनके राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. आतापर्यत गरिब दलितांवर अत्याचार होत होते. आता चक्क शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्याच गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. मात्र या प्रकरणात तब्बल १० …

Read More »

कोरोना: राज्यात साडे तेरा लाख चाचण्यांपैकी २ लाख ६० हजार पॉझिटीव्ह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, …

Read More »