रहने को सदा दहर में आता नही कोई। दादा, तुम जैसे गए ऐसे भी जाता नही कोई।। स्वर्गीय अजितदादांच्या पहिल्या जयंती निमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा कानावर आली आणि मन सुन्न झाले. दादांचा अतिदुर्देवी अपघाती मृत्यू निशब्द करणारा होता. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणातील विकासाचा झंझावात संपत चालल्याची चाहूल लागली आहे. …
Read More »वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अजेंडा चालवणाऱ्यांनाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडा दिसू शकतो विद्यार्थ्यांना जनावरासारख्या मारहाणीचे देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का? मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका
नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित
एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता.मावळ) येथील तीन हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे सदुंबरे येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली …
Read More »लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मान्यता
लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोक आयुक्त व उपलोक आयुक्त कार्यालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या दोन्ही कार्यालयांसाठी यापूर्वी ८७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. आता राज्य शासनाने केंद्र शासनाच्या …
Read More »राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये एक वर्षाकरिता आकांक्षित तालुका कार्यक्रम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन २०२६-२७ साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नीति आयोगाने देशातील दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व ५०० अल्प विकसित तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये राज्यातील …
Read More »पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डरे-सहमे नरेंद्र …
Read More »राहुल गांधी आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात चर्चा, पण ठिय्या आंदोलन सोडण्यास नकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर पोलिसांचे आगमन
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला होणाऱ्या गैरसोयीचे कारण देत आणि ते ठिकाण आंदोलनासाठी निश्चित केलेले नसल्याचे सांगून, प्रशासनाने राहुल गांधी यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील धरणे आंदोलन संपवण्याची विनंती केली. जितेंद्र सिंह म्हणाले की, नीट (NEET) आणि सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यास …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह खासदारांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सीजेपीच्या नेतृत्वाखालील तरूणांच्या मोर्चावर हल्ला पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावरून मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन
नुकतेच काल बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या अर्थात सीजेपीने काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, मंगळवारी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे अनेक खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरणे आंदोलन केले. …
Read More »
Marathi e-Batmya