Breaking News

काल ४८ जणांचा तर आज ५३ रूग्णांचा मृत्यू राज्यात १५०० नवे रूग्ण संख्या २२ हजार १७१ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाल्याची माहिती देत काल ४८ जणांचा मृत्यू झाले होते. मात्र आज त्यात वाढ होवून ५३ जणांचा …

Read More »

श्रमिक ट्रेन्सबरोबर आता प्रवासी रेल्वेही सुरु होणार : परंतु निवडक ठिकाणीच रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक जाहीर

नवी दिल्ली- मुंबई: विशेष प्रतिनिधी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक आपल्या मूळ ठिकाणाहून इतरत्र अडकल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विशेषत: स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक कामगारांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. आता त्या पाठोपाठ विशेष प्रवासी वाहतूकीच्या गाड्याही १२ मे पासून सुरु कऱण्याचा …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंसाठी काँग्रेसची माघार: मात्र राष्ट्रवादीसमोर लीन ९ वा उमेदवार मागे

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी …

Read More »

रेशन दुकानातून तांदळाबरोबर आता डाळही मोफत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुन २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरदाळ मोफत वाटप केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक …

Read More »

सोलापूरात ४१ जणांना घरी सोडले मात्र नव्याने ४८ जणांची भर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील ४१ कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी गेल्याने एकप्रकारचे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दुसऱ्याबाजूला ४८ नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचल्याची माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली. रविवारी १३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८४ जणांचे अहवाल नकारात्मक तर ४८ जणांचे …

Read More »

कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला ७५०० रूपये, विम्याचे संरक्षण द्या कामगार कृती समितीकडून मागणी दिवस

नाशिक-मुंबई: प्रतिनिधी लॉकडावून काळामध्ये कामगार कष्टकऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांना मोफत रेशन, आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना ७५०० रुपये आर्थिक सहाय्य, स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा ट्रेन व बसेसची मोफत सुविधा ,बंद उद्योग, पॉवर लूम उद्योग व अन्य व्यवसाय सुरू करा ,१२ तासाचा कामाचा दिवस करणारा अध्यादेश रद्द करा, उत्तर प्रदेश , मध्य …

Read More »

विदर्भातील ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त मृत्यूनंतर उघडकीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस

वर्धा: प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह. महिलेला शासकीय रुग्णालयात भरती होण्यासाठी नेत असताना मृत्यू. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. हिवरा तांडा गाव सील. आर्वीतील खाजगी रुग्णालय सुद्धा सील. तसेच …

Read More »

बंगलोर, नाशिक, नगरच्या रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायचींना आदेश

पुणे: प्रतिनिधी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा, जेवण, शौचालय तसेच अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुणे …

Read More »

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …

Read More »

सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …

Read More »