Breaking News

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »

११, १० आणि ९ वीचे विद्यार्थी परिक्षा न देता पुढच्या वर्गात परिक्षा रद्द केल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेवून इयत्ता दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपरला स्थगिती दिली होती. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने अखेर हे दोन्ही पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दोन पेपरची परिक्षा न देता गुण देण्यात येणार आहेत. …

Read More »

केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली ५३ हजार किट्सची मदत संघटनांच्या प्रतिनिधींकडे केली मदतसामुग्रीचे वितरण

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट बसेसचे चालक आणि वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी मदत सामुग्री- किट्स विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या-त्या क्षेत्रातील संघटनांकडे सुपूर्द करण्यात आले. मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि फेरीवाले, विक्रेते यांच्यासाठी अन्नधान्याच्या ३० हजार किट्स कामगार नेते शशांक राव यांच्याकडे सुपुर्द केल्या. एका परिवाराला लागणारा तांदूळ, गहू पीठ, डाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर आणि …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, स्वरूप कसे असेल माहित नाही मात्र तयारीत रहा डॉक्टर, नर्सेस, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण करेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी  करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. …

Read More »

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन : जनतेने खबरदारी घ्यावी आम्ही जबाबदारी घेवू १५ दिवसांनी वाढणार असल्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरु ठेवण्याची भूमिका राज्याच्यावतीने मांडण्यात आली. त्यामुळे या आजाराची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडण्यासाठी राज्यातील जनतेने खबरदारी आम्ही जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर …

Read More »

अधिकारी अमिताभ गुप्तांच्या निलंबनाचे अधिकार राज्य सरकारलाही ? अनिल गलगली यांनी सरकारला पाठविली नियमावली

मुंबई: प्रतिनिधी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या वाधवान बिल्डरवर मेहेरनजर दाखवित पत्र देणारे राज्याच्या गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांस निलंबित करण्याचा अधिकार केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारलाही असल्याची माहिती पुढे असून यासंदर्भातील नियमावलींची पुस्तिका-माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविण्यात आल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी …

Read More »

रेशन कार्ड नसलेल्या गरजूनाच अन्नधान्याचे किट द्या मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे परराज्यातील, राज्यांतर्गंत परजिल्ह्यातील कामगार-नागरीकांसमोर अन्नधान्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर काही स्वंयसेवी संस्थांनी अन्नधन्नाची पाकिटे वाटप करण्यास सुरुवात केली असून ही पाकिटे रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरीकांनाच द्यावी असे आदेश मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने दिले. विशेष म्हणजे या …

Read More »

लॉकडाऊन….व्हायरल व्हीडीओ संवेदनशील कलाकार आणि लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची खास कथा

भारतात लॉकडावून म्हणजे देवाने आपल्याला सुट्ट्या मिळण्यासाठी कोरोना आपल्या देशात पाठवला ही सात्विक समज आपल्या डोक्यात ठेवून रवी नेहमीसारखा घराबाहेर पडला. बाहेर पडताना त्याच्या आईने त्याला टोकले पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला बघायच होतं पोलीस खरंच त्यांच काम व्यवस्थित करत आहेत का? ग्राम पंचायतचा सदस्य या नात्याने त्याच्यावर ती महत्त्वाची …

Read More »

भाजपाचे सचिव म्हणतात, शिबिरात १० हजार कामगार- मग हे रिकामे कसे खोटी माहिती प्रसारीत केल्याचा उपाध्याय यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी गोरेगावच्या नॅस्को सेंटर /बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे रोज दहा हजार स्थलांतरित कामगारांना जेवण दिले जात असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र स्थानिक नगरसेवक पंकज यादव आणि भाजपाचे प्रदेश सचिव संजय उपाध्याय यांनी या स्थलांतरीत कामगारांच्या शिबीरास भेट दिली असता हे शिबीरच रिकामे असल्याचे दिसून असून या ठिकाणी एकही कामगार …

Read More »