Breaking News

… तर मंत्र्यांना दावणीला बांधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे आवाहन जालना – घनसावंगी : प्रतिनिधी दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत. जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु होणार

३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय …

Read More »

राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई

पदुमकडून शासन निर्णय जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी …

Read More »

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड होणार

महापौर बंगल्याची कागदपत्रे स्मारक समितीकडे हस्तांतरीत मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळील मुंबई महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची कागदपत्रे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक समितीचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नियोजित शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखाली दोन …

Read More »

दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान ! २४ ते २६ जानेवारीला वादळी पाऊस पडणार

शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि …

Read More »

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर

मंत्री, अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रिया स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राला उपविजेते पदाचा बहुमान मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी विशेष अभिनंदन केले आहे. …

Read More »

काँग्रेसचे झेंडे काढणाऱ्यांनो लोकांच्या मनातील झेंडे कसे काढणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा राणेंना नाव न घेता सवाल कणकवली: प्रतिनिधी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक …

Read More »

गोपीनाथ मुंडे हत्याप्रकरणी पंकजा मुंडे यांचे मौन

मंत्रिमंडळ बैठकीला ही गैरहजेरी मुंबई: प्रतिनिधी  ईव्हीएम मशिन्स हँकींगबाबतची माहिती भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांना असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद सुजी यांने लंडन येथील पत्रकार परिषदेत काल सोमवारी केला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बाल कल्याण आणि …

Read More »

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर

एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देणार मुंबई : प्रतिनिधी नियोजित शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी नाममात्र दरात जमिन उपलब्ध करून दिल्यानंतर या स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. तसेच या स्मारकासाठी द्यावयाचे १०० कोटी रूपये एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएकडे …

Read More »