Breaking News

आगामी निवडणूकांमध्ये अडचण होवू नये म्हणून जानकरांचा राजीनामा जानकर यांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा पण उमेदवारीचा पेच कायम

नागपुर : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांना एक वर्ष राहीलेले असताना भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडूण गेलेल्या पदुम मंत्री महादेव जानकर यांना आता स्वपक्षाची आठवण झाली आहे. मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून वावरणारे महादेव जानकर हे विधान परिषदेत मात्र भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या …

Read More »

मुंबईवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद नागपूरचे तुंबापूर झाल्याने शिवसेनेची भाजपवर आगपाखड

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होण्याची घटना घडते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यातील दुरावस्थेला मुंबई महापालिकेच्या अर्थात शिवसेनेला दोषी ठरविण्याचा प्रयत्न सर्व पक्षियांकडून केला जातो. मात्र यंदा पहिल्यादाच मुसळधार पावसाने नागपूरातील जनजीवनावर परिणाम झाल्याने भाजपच्या मंत्र्यांना …

Read More »

मुसळधार पावसाच्या पाण्याने नागपूरचे झाले तुंबापूर पावसाच्या पाण्यात गेला अधिवेशनाचा दुसरा दिवस

नागपूर : प्रतिनिधी दरवर्षीच्या प्रथेला पहिल्यांदाच फाटा देत यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. मात्र नागपूरात पहिल्यांदाच काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या मनसुब्यावर पाणी फिरविल्याने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणतेही कामकाज होवू शकले नाही. परंतु मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण …

Read More »

भावी पिढीसमोर जल,जंगल,जमीन वाचविण्याचे आव्हान १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा शुमारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता

ठाणे : प्रतिनिधी वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल,जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून त्यादृष्टीने आमच्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत असेही ते …

Read More »

घरबांधणीसाठी आता म्हाडाही खाजगी विकासकांना पैसे देणार मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जॉईंट व्हेंचर योजनेच्या तयारीसाठी गृहनिर्माण विभागाकडून लगबग

मुंबई : प्रतिनिधी राज्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारणीसाठी म्हाडाची राज्य सरकारने स्थापन केली. मुंबईत नव्याने घरांची उभारणी करण्यासाठी जमिन उपलब्ध नसल्याने म्हाडा मार्फतच शहरातील बीडीडी चाळीच्या पुर्नविकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या पुर्विकासासाठी एकाबाजूला पैसे नसताना दुसऱ्याबाजूला पुन्हा खाजगी जमिन मालकांना अर्थात खाजगी विकासकांना त्यांच्या जमिनीवर घरे उभारणीसाठी पुन्हा …

Read More »

महाराष्ट्रातही दुधाच्या भुकटीला ५० रुपये अनुदान द्या कृषी राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मान्सूनच्या अनुकूलतेमुळे आगामी काळात दुधाचे उत्पन्न वाढणार असून त्याचा परिणाम दुधाचे आणखी दर घसरण्यावर होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही  गुजरात राज्याप्रमाणे दुधाच्या भुकटीवर ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गुजरात राज्यामद्ये दूध उत्पादकांना …

Read More »

संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली. ही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या …

Read More »

मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवणार – मंत्री प्रा. राम शिंदे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग.ला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन राजशिष्टाचार व ओबीसी कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने मुस्लिम ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत …

Read More »

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्लीन फ्युएल)  वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या ९ व्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD)बिडींग राऊण्ड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …

Read More »