औरंगाबाद: प्रतिनिधी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाच्याविरोधात संतापलेल्या ३७ शेतकर्यांनी (बुधवारी) दुपारी १ च्या सुमारास सामूहीक आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. गंगापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव …
Read More »शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन
नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …
Read More »गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मागणी
परभणी : प्रतिनिधी गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते …
Read More »‘ती’ पुस्तके दोन वर्षापूर्वीची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या आरोपावर शिक्षणमंत्री तावडे यांची सारवासारव
मुंबई: प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महापुरूषांबरोबर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ज्या पुस्तकांचा उल्लेख काहीजणांनी केला ती सर्व पुस्तके दोन वर्षापूर्वीची असल्याचे सांगत आताची जी पुस्तके छापलेली आहेत. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे …
Read More »गारपीटग्रस्तांमधील बागायतदारांना १३ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजाराची मदत कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या एनडीआरएफच्या धोरणानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या निकषानुसार मोसंबी आणि संत्र्याला प्रति हेक्टरी २३ हजार ३०० रुपये, केळीला प्रति हेक्टरी ४० हजार रुपये, आंबा पिकाला प्रति हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये मदत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी देत बागायतीदार …
Read More »दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, वंचितांसाठी राज्यात ११ विशेष न्यायालये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या घटकासंबंधी एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा आज बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या घटकांना जलद न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग, वरिष्ठ …
Read More »सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना बदली करून घेता येणार महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत …
Read More »पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटींचा घोटाळा मुंबईतील शाखेतील घोटाळा उघडकीस मात्र बँकेची चुप्पी
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल ११ हजार ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेने हा घोटाळा आणि अनधिकृत व्यवहारांचा शोध लावला आहे. हे व्यवहार बँकेच्या मुंबईतील शाखेतून झाले असून बँकेकडून बुधवारी असे व्यवहार झाल्याची माहिती उघडकीस आणली. या वृत्तानंतर शेअर बाजारातील पीएनबीचे शेअर्स ५.७ …
Read More »कैद्याच्या मृत्यूची तक्रार दाखल करण्यावरून दोन पोलिस निरिक्षकांमध्ये भांडण औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील निरिक्षक आमने-सामने
औरंगाबाद : प्रतिनिधी दोन व्यक्तींमधील वाद अथवा भांडणे सोडविण्यासाठी नागरिकांकडून पोलिसांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र तुरूंगातील कैद्याचा मृत्यू रूग्णालयात झाल्याने त्याची नोंद घेण्यावरून औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षकच एकमेकांवर धावून जात भांडणे करत असल्याचा अजब किस्सा नुकताच घडला. सहा महिन्यांपासून हर्सूल कारागृहातील एक कैदी बबन चंदू सोनवणे …
Read More »२० लाख एलईडी दिव्यांनी उजळणार राज्यातील रस्ते ईईएसएलसोबत आज होणार सांमज्यस करार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या वीज बीलाच्या रकमेत बचत होण्याकरीता राज्याच्या ऊर्जा विभागाकडून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने शहर, तालुका आणि जिल्ह्यातंर्गत रस्त्यांवर तब्बल २० लाख एलईडीच्या दिवे बसविण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईईएसएल आणि ऊर्जा विभागा दरम्यान आज बुधवारी …
Read More »
Marathi e-Batmya