Breaking News

केंद्रीय कृषी आयुक्त सिंग यांची माहिती, ब्रोकोलीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणार जे डब्लू मॅरियट जुहू येथे परिषदेचे उद्घाटन

केंद्र सरकार ब्रोकोलीच्या लागवड, प्रसार, पायाभूत सुविधा विकास आणि कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी समर्पित उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करणार आहे. पोषक तत्त्वांनी नैसर्गिक सुपरफुड असलेल्या ब्रोकोलीला लोकप्रिय करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कृषी आयुक्त, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), भारत सरकार, डॉ. पी.के. सिंह यांनी मुंबईतील हॉटेल …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हिएम EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा नुकताच निकाल जाहिर झाला. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़ घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळमधील बेंबळा …

Read More »

वाहनधारकांना मोठा दिलासा: अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत …

Read More »

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी, नव्या संस्थेची स्थापना विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना

जगभरातील विविध  देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra Agency for Holistic International Mobility & Advancements -MAHIMA) स्थापन आणि कार्यान्वित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस होते. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरूणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता …

Read More »

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने “मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या राज्य निवडणूक आयोगाने जारी केली माहिती

मागील ७ ते नऊ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. तर आज या महानगरपालिकांचे निकाल मतमोजणीनंतर जाहिर करण्यात आले. मात्र आज झालेल्या मतमोजणीत चंद्रपूर, कोल्हापूर वगळता जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी महापालिकांच्या …

Read More »

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार जणांना आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून निमंत्रण

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुशासन, विकास आणि पारदर्शकतेचा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात साज-या झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, फिक्सिंग काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे …

Read More »