Breaking News

नाना पटोले यांचे आश्वासन, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारचे

सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते. आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, नाही तर गणपतीलाही पुढची तारीख दिली असती… न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा करायची की करायची नाही आता जनतेच्या न्यायालायत

दोन तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पुजाही केली. या घटनेवरून कायदेतज्ञांबरोबर राजकिय नेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य करत पंतप्रधान मोदी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशासाठी प्रयत्न सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय …

Read More »

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे …

Read More »

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची ग्वाही, देश म्हणून सर्व श्रेय राज्यघटनेला राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका, पंधराशे रु. पेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं संरक्षण देणं गरजेचं ज्यांना सत्तेचा माज...त्यांना खड्यासारखं बाजूला काढायचं

हा तालुका कष्टकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण दिसत काय… इथे गुंडगिरी सुरू झाली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. खोटे खटले निरपराध लोकांवर भरायचे आणि दमदाटी करून गुंडगिरीचं राज्य आणू शकतो असं चित्र काही लोकांनी उभं केलं आहे. दुर्दैवाने त्यांना २०-२० वर्ष आमदारकी दिली ती आमदारकी इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न वापरता …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, निवडणूकीचा कालावधी येईपर्यंत आपली बहिण आठवत नव्हती… हे सरकार गेल्यात जमा , वेळ पडली तर तर आंदोलनकर्त्यांबरोबर आंदोलन करतील

कोकणातील दौऱ्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात …

Read More »

अरविंद केजरीवाल यांची घोषणा, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार… ब्रिटीशांपेक्षा अधिक हुकूमशाहीचे केंद्रातील सरकार

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लीकर पॉलिसी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला. मात्र जामीन देताना मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाही, कोणत्याही फाईलीवर सही करणार नाही, असलेल्या पुराव्यांशी संपर्क आणि छेडडछाड करणार नसल्याच्या अटी घातल्या. त्यानंतर दोनच दिवसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री अरविंद …

Read More »

फोर्ड कार निर्माती कंपनी पुन्हा एकदा गाड्यांचे उत्पादन सुरु करणार तामीळनाडूतील प्लांट सुरु करण्याबाबत दिले इरादा पत्र

यूएस कार निर्माता फोर्ड कंपनीने भारतात उत्पादन थांबवल्यानंतर दोन वर्षांनी चेन्नईतील प्लांटमध्ये उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे, देशात तीन दशकांनंतर पुन्हा एकदा फोर्ड गाडीचा प्लांट सुरु करण्याचा इरादा दाखवला आहे. कंपनीने तामिळनाडू सरकारला एक पत्र ऑफ इंटेंट (LOI) सादर केले आहे, ज्याने निर्यात-केंद्रित उत्पादनासाठी सुविधेचा वापर …

Read More »

आधार कार्ड अपडेटची मुदत वाढविली १४ डिसेंबर पर्यंत मुदत वाढविली

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मोफत आधार अपडेट्सची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होईल. ही मोफत सेवा फक्त माय आधार #myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. युआयडीएआय UIDAI लोकांना त्यांच्या आधार #Aadhaar मध्ये दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे,” युआयडीएआय UIDAI ने …

Read More »