नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची १३,८६४ किलो हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी सुरळीत होण्यासाठी १.५ लाख रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप असलेल्या पंजाब लुधियाना येथील एका व्यक्तीला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयाने आरोपी गुर्जुगदीप सिंग स्मघचा दीर्घकाळ तुरुंगवास आणि अधिकृत आरोपांची कमतरता जामीन मंजूर करण्याची प्रमुख कारणे असल्याचा आणि आरोपी जवळजवळ दोन वर्षे कोठडीत असल्याचे निरीक्षण न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने स्मघला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. तसेच स्मघला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला त्याचवेळी महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) चालू तपासात सहकार्य करण्याचे आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडण्यापासून दूर राहण्याचेही आदेश दिले.
डीआरआयने २०२२ मध्ये गुप्त माहितीच्या आधारे न्हावा शेवा बंदरातून पंजाबला जाणाऱ्या कंटेनरची तपासणी केली. स्मघ ट्रेडिंग या कंपनीच्या वतीने कंटेनर पंजाबमधील होशियारपूर येथे नेले होते आणि त्यातील बॅगमध्ये लपवलेले हेरॉइन ड्रग्ज आढळले. पुढील तपासात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली, त्याच्या जबाबात स्मघचे नाव समोर आले. स्मघवर कट रचणे, पुरावे नष्ट करणे,मोबाईल फोन आणि सिम कार्ड नष्ट करणे आणि अटक टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून जर त्याला सोडण्यात आले तर तो फरार होऊ शकतो असा दावा सरकारी वकिलांना होता. दुसरीकडे, कथित निधी हस्तांतरणाव्यतिरिक्त स्मघविरुद्ध कोणताही थेट पुरावा नाही. आरोपांशिवाय स्मघला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तथापि, आरोपीची गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तसेच अधिकृत आरोप निश्चित न करता दीर्घकाळ तुरुंगवास भोगणे हा जामीन मंजूर करण्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो, याकडे लक्ष वेधून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
Marathi e-Batmya