उच्च न्यायालयालयाचा सल्ला, वाद सौहार्दाने सोडवण्याचा प्रयत्न करा व्यापारचिन्हावरून लोढा बंधूमधील वादाचे प्रकरण

लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडववावा, असा सल्ला उच्च न्यायालयाने अभिषेक आणि अभिनंदन या लोढा बधुंना सोमवारी दिला. हा वाद प्रामुख्याने दोन बंधूमधील असल्याने तो शांततेच्या मार्गाने सोडवावा, असेही न्यायालयाने लोढा बंधुंना उपरोक्त सल्ला देताना नमूद केले. तसेच, याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले.

अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने काही दिवसापूर्वी अभिनंदन यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. लोढा या व्यापारचिन्हाचे स्वामित्त्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे, लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांनी केली होती. न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. हा वाद दोन भावांमधील आहे. लोढा या नावावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी किंवा पक्षकार मध्यस्थाद्वारे हा वाद सोवडवण्यास तयार आहेत का ? अशी विचारणा मॅक्रोटेक डेव्हलपर्ससह अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांना न्यायालयाने केली. त्याचवेळी. दाव्याशी संबंधित पक्षकार मध्यस्थाद्वारे हा वाद सोडवण्यासाठी तयार असल्यास त्यांनी मंगळवारी तसे स्पष्ट करावे. त्यानंतर, माजी मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली जाईल. तसेच, ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही सांगितले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय ?

आपल्या कंपनीकडे ‘लोढा हे व्यापारचिन्ह आणि इतर विविध नोंदणीकृत व्यापारचिन्हांची मालकी आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सने याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचा दावा केला आहे. तसेच, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेली ही बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी होती आणि लोढा या नावाअंतर्गत कंपनीने निवासी व व्यावसायिक बांधकामे केली आहेत. याचिकेनुसार, लोढा समुहातील सर्व कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा अंतर्गत करार २०१५ पर्यंत अस्तित्त्वात होता. त्यानंतर अभिनंदन लोढा समुहापासून वेगळे होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला मार्च २०१७ मध्ये आणि नंतर २०२३ मध्ये कौटुंबिक सामंजस्य कराराद्वारे वेगळे होण्याच्या अटी निश्चित केल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. परंतु, २०२३ मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना आपण बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.

About Editor

Check Also

केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती, सोनम वांगचूक यांना प्रकृतीमुळे सोडता येणार नाही तर सर्वोच्च न्यायालय म्हणते, वांगचूक यांच्या प्रकृतीमुळे पुर्नविचार करा

केंद्र सरकार आणि लेह प्रशासनाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव ताब्यात घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *