उच्च न्यायालयाची कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करण्यास परवानगी २२ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान तयारीस राज्य सरकारला न्यायालयाची अनुमती

कोरेगाव-भीमा येथील लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या १ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तसेच ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यास राज्य सरकारला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारने उच्च न्यायालयात विजयस्तंभाच्या वादग्रस्त जागेवर प्रवेश करण्यास परवानगी मिळवण्यासाठी याचिका केली होती. न्या. श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकारला परवानगी दिली. त्यानुसार, २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत सरकरला कार्यक्रमाची तयारी करण्यास परवानगी असणार आहे. तर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वसामान्यांना येथे प्रवेश देण्यात येणार येईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

सहा वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कोरेगाव- भीमा या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर ती जागा वादग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. दंगल उसळल्यानंतर शौर्यदिनी विजयस्तंभाच्या जागेवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. म्हणूनच राज्य सरकार परवानगीसाठी न्यायालयात याचिका केली जाते आणि न्यायालयाकडून ठराविक कालावधीसाठी या जागेत प्रवेशास मुभा दिली जाते.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *