कुर्ला बेस्ट बस दुर्घटना प्रकरणीः चालक संजय मोरेला कोठडी चालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसच्या चालक असलेल्या मोरेला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले आणि अपघाताच्या पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरून मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

अचानक गाडी समोर स्पार्क झाला आणि गाडीने स्पीड पकडला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे संजय मोरेच्या वतीने अॅड. समाधान सुलाने यांनी युक्तिवाद करताना सांगितले. त्यामुळे अपघातासाठी चालक मोरे नाही तर इलेक्ट्रिक वाहनामधील त्रुटी जबाबदार असल्याचा दावा आरोप करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे, आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीने बेस्टमध्येच काम करायचा. त्याला १० दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीने बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून नेमण्यात आले होते. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, चित्रपट निर्मिती जोखमीचा व्यवसाय केवळ नफा न मिळणे हा फसवणूकीचा व्यवसाय ठरू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका चित्रपट निर्मात्यावरील फसवणुकीचा खटला रद्द केला, ज्याने चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *