काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुणे न्यायालयात सांगितले की, अलिकडच्या राजकीय संघर्षांमुळे आणि त्यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात तक्रारदार आणि सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांच्या मुळे जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाला विनंती केली की, त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आणि खटल्यातील कार्यवाहीच्या निष्पक्षतेसाठी “गंभीर भीती” म्हणून वर्णन केलेल्या गोष्टींची न्यायालयीन दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी केली.
तसेच राहुल गांधी यांनी राज्य सरकारकडून “प्रतिबंधात्मक संरक्षण” देखील मागत “प्रतिबंधात्मक संरक्षण हे केवळ विवेकपूर्णच नाही तर राज्याचे संवैधानिक कर्तव्य आहे,” असल्याची बाबही यावेळी अधोरेखित केली.
वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, हे पाऊल सध्याच्या कार्यवाहीची निष्पक्षता, अखंडता आणि पारदर्शकता जपण्यासाठी एक संरक्षणात्मक आणि सावधगिरीचा उपाय असल्याचेही यावेळी सांगितले.
२९ जुलै रोजी दाखल केलेल्या लेखी निवेदनात, सात्यकी सावरकर यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे की, ते त्यांच्या मातृवंशातील नथुराम गोडसे आणि महात्मा गांधींच्या हत्येतील प्रमुख आरोपी गोपाळ गोडसे यांच्या वंशातून थेट वंशज आहेत आणि विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज असल्याचा दावा केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, तक्रारदाराच्या वंशाशी जोडलेल्या हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तींचा दस्तऐवजीकरण केलेला इतिहास पाहता… राहुल गांधी यांना हानी पोहोचवू शकते, चुकीचे आरोप होऊ शकतात किंवा इतर प्रकारचे लक्ष्यीकरण केले जाऊ शकते अशी स्पष्ट, वाजवी आणि ठोस भीती असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या अर्जात स्पष्णपणे नमूद केले.
महात्मा गांधी यांची हत्या ही आवेगातून केलेली कृती नव्हती; तर ती एका विशिष्ट विचारसरणीत रुजलेल्या कटाचा नियोजित परिणाम होतो, ज्याचा परिणाम निहत्था व्यक्तीविरुद्ध जाणूनबुजून हिंसाचारात झाला, असे याचिकेत म्हटले आहे.
अशा वंशाशी संबंधित गंभीर इतिहास पाहता, बचाव पक्षाला खरी आणि वाजवी भीती आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ नये,” असे राहुल गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे.
या अर्जात राहुल गांधी म्हणाले की, अलीकडील राजकीय हस्तक्षेपांचाही तपशील देण्यात आला आहे, ज्यामध्ये ११ ऑगस्ट रोजी संसदेत “मत चोर सरकार” ही घोषणा देण्यात आली होती आणि निवडणूक अनियमिततेचा आरोप करणारी कागदपत्रे सादर करण्यात आली होती, ज्या कृतींमुळे राजकीय विरोधकांकडून द्वेष निर्माण झाला आहे, असा त्यांचा दावा होता.
राहुल गांधी यांनी आपल्या याचिकेत संसदेत त्यांनी केलेल्या भाषणाचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, खरा हिंदू कधीही हिंसक नसतो. हिंदू द्वेष पसरवू शकत नाही. भाजपा द्वेष आणि हिंसाचार पसरवतो आणि तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही असेही सांगितले.
तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू समुदायाचा अपमान केल्याचा आणि त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप करून तात्काळ पत्रकार परिषदा घेतल्याचे अधोरेखित केले.
त्यात दोन सार्वजनिक धमक्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधी यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते आणि दुसरी भाजपा नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी ही असाच पद्धतीची धमकी दिल्याचा उल्लेख देण्यात आला.
मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सात्यकी सावरकर यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. सावरकर आणि इतरांनी कथितरित्या एका मुस्लिम पुरूषावर हल्ला केल्याचा उल्लेख सात्यकी सावरकर यांनी केला होता. सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख करून सात्यकी सावरकरांनी सावरकरांच्या प्रकाशित ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या वृत्ताच्या अस्तित्वावर आक्षेप घेतला आणि त्या टिप्पण्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली.
त्यांनी कलम ५०० आयपीसी अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याची आणि कलम ३५७ सीआरपीसी अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे.
पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.
Marathi e-Batmya