अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या चित्रकरणा दरम्यानची घटना

मुंबई : प्रतिनिधी

बॅलिवुडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बॅालिवुडकरांसोबत जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागील काही दिवसांपासून अमिताभ राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. उन्हाचा तडाखा आणि बदलतं वातावरण यांच्या परिणामामुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याचं सूत्रांकडून समजतं.

अमिताभ यांच्यावर सध्या जोधपूरमध्येच उपचार सुरू आहेत. त्यासाठी डॅाक्टरांचं एक विशेष पथक मुंबईहून जोधपूरला रवाना झाल्याचं समजतं. गरज भासल्यास त्यांना विशेष चार्टेड विमानाने मुंबईत हलिवण्यात येणार असल्याचंही बोललं जात असलं तरी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मागील आठवडाभरापासून अमिताभ जोधपूर मुक्कामी आहेत. तब्बेत बिघडल्याने काल त्यांनी चित्रीकरण केलं नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

 

 

 

About Editor

Check Also

Mahima Chaudhary has entered into a 'second marriage' with actor Sanjay Mishra.

अभिनेत्री महिमा चौधरीने अभिनेता संजय मिश्रा यांच्याशी “दुसऱ्यांदा” लग्न केले अभिनेत्री महिमा चौधरीने अभिनेता संजय मिश्रा यांच्याशी "दुसऱ्यांदा" लग्न केले

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीने अभिनेता संजय मिश्रा यांच्याशी “दुसऱ्यांदा” लग्न केले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *