Breaking News

फिल्मीनामा

बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही

अभिनेता आमिर खान यांचे मत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार …

Read More »

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार बशीर मोमीन (कवठेकर) यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे …

Read More »

अभिनय आणि लेखणीतून हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द करणारे कादर खान यांचे निधन

कँनडा येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू मुंबई : प्रतिनिधी हिंदी, मराठी भाषिक सिनेरसिकांना आपल्या अभियाच्या माध्यमातून कधी हसायला लावणारे तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून भीती निर्माण करणारे आणि लेखनीतून सर्वोत्तम पटकथा, संवाद लिहीणारे सुप्रसिध्द अभिनेता, लेखक कादर खान यांचे कँनडा येथे आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही …

Read More »

अटल महोत्‍सवात “आय अँग्री” एकांकिका सर्वप्रथम

तरूणाईच्‍या प्रचंड उत्‍साहात अटल महोत्‍साची सांगता मुंबई : प्रतिनिधी मुंबई भाजप आणि महाराष्‍ट्र एकता अभियान यांच्‍यातर्फे आयोजित अटल महोत्‍सवातील एकांकिका स्‍पर्धेत पुण्‍याच्‍या आमचे आम्‍ही पुणे या संस्‍थेच्‍या “आय अॅग्री” या एकांकिकेने प्रथम तर डोंबिवलीच्‍या स्‍वामी नाटयांगन या संस्‍थेच्‍या “बिफोर द लाईन या दुसरे तर गंधर्व  कलाधार या संस्‍थेच्‍या “रेनबोवाला” या एकांकिेकेने तिस-या क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. …

Read More »

मराठी भाषेविषयी शासन संवेदनशील नाही

२० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उदघाटन  मुंबई : प्रतिनिधी  केवळ मराठी भाषा संमेलने करून मराठीची वाढ होणार नाही. मराठी भाषेत रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, मराठीचा दर्जा वाढविण्यात आपले शासन संवेदनशील नसल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे व्यक्त केली.   जगातील कोणताही विषय किचकट नसतो. साहित्य निर्माण करण्यासाठी विद्वेतेपेक्षा …

Read More »

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था ‘वाऱ्यावरची वरात’ सारखी अकादमीला पूर्णवेळ संचालकच मिळेना

मुंबई : खंडूराज गायकवाड महाराष्ट्रातील संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था सध्या पुलं च्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाच्या नावाला शोभेल अशी झाली आहे. कारण सध्या या अकादमीला पूर्ण वेळ प्रकल्प संचालक मिळत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला. …

Read More »

जिद्द, स्वाभिमानाच्या जोरावर महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या एका लोक कलावंतीनीचा प्रवास राष्ट्रपती पुरस्कारापासून कांताबाई अजूनही उपेक्षित

कुणी मार्गदर्शक नाही. नृत्यसाधनेतला गुरु नाही. एक लव्याप्रमाणे स्वत:च नृत्य शिकत त्यांनी तमाशा फड उभा करून तो लोकप्रियतेच्या  शिखरावर पोहचविला. महाराष्ट्राच्या तमाशावर प्रेम करणारे रसिक आज जिथे- जिथे आहेत,तिथे- तिथे   त्यांचे  नाव आदराने  घेतले  जाते. वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रम आणि त्यानंतर तमाशात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी फारसं उत्पन्न …

Read More »

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम-लक्ष्मण यांना जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या …

Read More »

सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि त्यांच्या पत्नी बनल्या गीतकार डॉ.आंबेडकरांच्या विचारावर लिहीलेल्या गाण्यांवरील युगंधर गीत अल्बमचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी सक्रिय राजकारणात राहुनही आपला छंद आणि आवड जपणारे राजकारणी फारच बोटावर मोजण्या इतके असतात. राजकारणात असूनही आपल्या कवितांमुळे वेगळा ठसा उमटविणारे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव आदराने घेतले जाते. अगदी त्याच वाटेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा बडोले हे जात …

Read More »

‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष सरकार उत्साहात साजरा करणार नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी,  प्रसिध्द कवी, पटकथा आणि संवाद लेखक ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा तसेच लोकप्रिय लेखक, नाटककार, कथाकार पु.ल.देशपांडे अर्थात पु. लं. यांचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या महनीय व्यक्तींच्या कार्यांचा गौरव व्हावा यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनामार्फत …

Read More »