९९ रुपयात करा विमान प्रवास एअर एशियाची प्रवाशांसाठी खास ऑफर

नवी दिल्लीः प्रतिनिधी

विमान कंपनी एअर एशियाने प्रवाशांसाठी एक खुषखबर आणली आहे. कंपनीने खास ऑफर प्रवाशांना दिली असून एअर एशियाने प्रवास करू इच्छीणाऱ्या प्रवाशांसाठी आता फक्त ९९ रुपयांमध्ये देशातंर्गत विमान प्रवास करता येणार आहे. ही ऑफर १५ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान तिकीटे बुक करणाऱ्यांसाठी असल्याचे एअर एशियाच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

विशेषतः बंगळुरु, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांची या सात ठिकाणी ९९ रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. याशिवाय एअर एशियाच्या विमानाने भारतातून निवडक १०  देशांमध्ये प्रवास करायचा असल्यास त्यावरही सूट मिळणार आहे. ऑकलंड, बाली, बँकॉक, क्वालालंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनी या देशांमध्ये फक्त १ हजार ४९९ रुपयांच्या मूळ तिकीट दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अर्थसंकल्पातून सामाजिक न्यायाची भूमिका हरपली अमेरिकेच्या टेरिफचे भारतावर गंभीर परिणाम, जगात जे ४० वर्षात घडले नाही ते घडत असून ही फक्त सुरुवात: संजीव चांदोरकर

पूर्वी अर्थसंकल्पावर मोठ मोठ्या चर्चा होत असत व ते समजावून सांगितले जात असे पण आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *