४४ दिवसानंतर बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिवास अटक उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आज केली अटक

बदलापूर दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि अध्यक्ष उदय कोतवाल यांना ठाणे पोलिसांच्या परिमंडळ एकने ४४ दिवसानंतर आज अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेला इनकांऊटर आणि उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांना झालेल्या अटकेची वेळ यावरून तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा इनकांऊटर होईपर्यंत उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे दोघेही फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. तसेच या दोघांचा ठावठिकाणा काही केल्या लागत नसल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात येत होता. अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर झाल्यानंतर उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणे आणि तो न्यायालयाने फेटाळणे याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या आपटे आणि कोतवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेताना या दोन्ही फरार आरोपांच्या जामीनाची पोलिस वाट पहात आहेत का असा सवाल पोलिस प्रशासनाला केला होता. त्यानंतर २४ तासाच्या आत पोलिस परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *