आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

धारावीबाबत आज पुन्हा आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केले. कोणीही विचारले नसताना आपले पिताश्री वारंवार सांगतात हा मर्दांचा पक्ष आहे म्हणून जर तुम्ही मर्दांचा पक्ष असाल तर खुल्या चर्चेला या, तुम्ही सांगाल तिथे चर्चेला यायला मी तयार आहे. आदित्य ठाकरे यांना उत्तरे देता येत नाहीत म्हणून आमच्या वर्षा गायकवाड यांना पुढे करुन अडचणीत आणू नका, असा इशारा देत आपल्याच परिवारातील प्राणी मित्र एका युवकांसाठी धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड बळकवण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या पक्षाकडून होतोय. त्यासाठीच धारावी पुर्नविकासाला विरोध केला जातोय असा अरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, फेक नेरेटिव्ह रोखणे माझे काम आणि मुंबईकरांच्या हितासाठी बोलणे माझे कर्तव्य आहे. आता राष्ट्रीय पक्षांचे काही नेते पण शहरी नक्षलवाद्यांचे अजेंडा मांडू लागलेत. म्हणून पळ काढणाऱ्या आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान हिंम्मत असेल तर चर्चेला या. अन्यथा निर्बुध्द म्हणून तुम्हाला दिलेली पदवी खरी ठरेल, असा टोलाही यावेळी लगावला.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, अदानीला अधिकचा एफएसआय दिला असे खोटे पसरवले जाते, पुर्नविकासाच्या प्रचलीत नियमापेक्षा एक इंचही अधिकचा एफएसआय धारावीसाठी देण्यात आलेला नाही त्यामुळे केवळ खोटं पसरवून, धारावीकरांची माथी भडकवून मते मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करीत आहेत. मुंबईकरांनी सावधान झाले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जो शिक्का धारावीच्या माथी आहे तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. ४३० एक जागेपैकी २३० एकर जागेमध्ये मोकळया जागा, मैदान, बगिचा, मेट्रो, बस, मोनो, रेल्वे, भूयारी मेट्रोचा मल्टी कॉरिडॉर ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे त्याला विरोध करुन त्यापासून मुंबईकरांना वंचित ठेवले जातेय. या भागातून मुंबई महापालिकेला एकही रुपयांचा मालमत्ता कर,सिव्हरेज टॅक्स, दुकान लायन्सन फी मिळत नाही हे उत्पन्न वाढवणारे तसेच रेंटल घर योजनेतून, घरांच्या विक्रीतून मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे त्याला विरोध केला जातोय. मुंबईत करून सावधान आणि म्हणून आमची विनंती आहे मुंबईकर तुम्ही व्यक्त व्हा, मुंबईकर तुम्ही तुमच्या मुलभूत अधिकारासाठी व्यक्त व्हा आणि धारावीकर हो तुम्ही तुमच्या हक्कासाठी व्यक्त व्हा, असे आवाहन करत विरोधकांची लढाई अदानासाठी आहे आमची लढाई गरिबांच्या घरासाठी आहे. त्यांच्या डोक्यात फक्त अदानी, आमच्या डोक्यात धारावी आणि मुंबईकराला मिळणाऱ्या सेवा सुविधा आहेत, म्हणून काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ही सुरुवात आहे हिम्मत असेल तर उत्तरे दयावीत, असे आव्हानही यावेळी दिले.

पुढे बोलताना आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने २००० पुर्वीच्याच झोपडयांना संरक्षण दिले होते भाजपा सरकारने २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे धारावीतील २०११ पर्यंतच्या रहिवाशांना धारावीतच घरे मिळतील. त्यानंतरजी घरे आहेत म्हणजे ज्यांनी दोन मजले बांधले आहेत जी अशा पुर्नविकासात पात्र ठरत नाहीत अशा घरांनाही मुंबईतच घर मिळणार असून अशा प्रकारची घरे देणारी ही पहिली योजना असणार आहे. मग धारावीतील गरिबांना घरे मिळत असताना अदित्य ठाकरे यांचा विरोध का, असा सवालही केला.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, आदित्य ठाकरे मराठी, मुस्लिम, दलित यांच्या विरोधी आहेत काय, आदित्य ठाकरे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बेदारांना घर या भूमिकेचे विरोधक आहेत, तुम्ही एवढे अती बुद्धिमान असाल तर मुंबई शहरात एक तरी प्रोजेक्ट दाखवा जो तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना वरच्या मजल्यावरच्या किंवा २०११ नंतरच्या झोपडपट्टी वासियांना संरक्षित करून घर देण्याचा प्रयत्न केला का असा सवालही यावेळी केला.

मुंबई पोलिसांनी नियमावली तयार करावी-आशिष शेलार
ज्या पध्दतीने संजय राऊत यांनी नाना पटोले यांना हाडतूड केल्याची माहिती मिळतेय त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांनी यापुढे कायदा सुव्यवस्थेसाठी आघाडीच्या बैठकांबाबत काही नियम करण्याची गरज आहे.
१) नेत्यांनी पादत्राणे बाहेर ठेवावी
2) स्वसंरक्षणासाठी असेल तर असलेली शस्त्र बाहेर ठेवावीत
3) अंगरक्षक हत्यारे घेऊन आत सोबत ठेवू नये
कारण येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गँगवाँर होऊ शकते. हाणामारी होऊ शकते. म्हणून पोलिसांनी आधीच काळजी घ्यावी, असा उपरोधिक टोला ही याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांना आशिष शेलार यांनी लगावला.

About Editor

Check Also

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *