राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्या जागेवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मेट्रो रेल्वे विभागाच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता २०१४ सालापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी असलेल्या ब्रिजेश सिंग यांना प्रशासकिय सेवेत आणत त्यांना आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला होता. तसेच आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाचा पदभारही सोपविला. त्यामुळे मागील अनेक वर्षे ब्रिजेश सिंग हे महासंचालक म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाचा कारभार पहात होते. मात्र महायुतीचे सरकार येताच ब्रिजेश सिंग यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
मात्र आता पुन्हा मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होताच आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदावरून मुळ जागेवर अर्थात सायबर क्राईम या पदावर पुर्ननियुक्ती करण्यात आली आहे. तर ब्रिजेश सिंग यांच्याऐवजी मुंबई मेट्रोच्या सातत्याने कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे एमएमआरडीच्या मेट्रो विभागाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून अश्विनी भिडे या सर्वाधिक काळ राहिलेल्या अधिकारी आहेत. त्यामुळे आणखी किती काळ अश्विनी भिडे या मेट्रोच्या अतिरिक्त पदावर राहणार, त्यांच्यावर इतकी मर्जी का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अश्विनी भिडे यांची बदली थेट मुंबई महापालिकेत करण्यात आली.
त्यानंतर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली पुन्हा एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पावर अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर येताच अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून आज करण्यात आली आहे.
Marathi e-Batmya