एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही लढत सोपी नसल्याचे दिसून आले. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ६६ हजार २७४ मते मिळवित विजयी ठरल्या. मात्र देशातील निवडणूकीच्या इतिहासात पहिल्यांदाच नोटा अर्थात कोणताच उमेदवार नाही याखाली १२ हजार ७७६ मते मिळाली.

अधेरी पोट निवडणूकीसाठी फक्त ३१.८४ टक्के मतदान झाले. अंधेरीतील विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येपेक्षा हे प्रमाण फारच कमी आहे. तर एकूण ८६ हजार १९८ इतक्या मतदात्यांनी आपला हक्क बजाविला.

आज झालेल्या मतमोजणीत एकूण १९ मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या. यातील पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटके यांना आघाडी मिळत होती. तर दुसऱ्याबाजूला नोटाला पडणारी मतेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. १९ व्या फेरी अखेर ऋतुजा लटके यांना ६६ हजार २४७ मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाळा नाडार-१५०६, मनोज नायक-८८८, नाना खेडेकर-१५११, फरहाना सय्यद-१०८७, मिलिंद कांबळे-६१४, राजेश त्रिपाठी-१५६९ अशी मते मिळाली. तर नोटाला १२ हजार ७७६ इतकी मते मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मते मिळाल्याने ही निवडणूक वैशिष्ठपूर्ण ठरली.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *