मुंबई

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतरीत पुनर्वसन इर्शाळवाडी घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारले तर या व्हॉट्सॲपवर नंबरवर करा तक्रार पहिवहन विभागाकडून व्हॉट्स अॅप नंबर जारी

शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, इर्शाळवाडीची दुर्घटना झाल्याने वाढदिवस साजरा करू नका मात्र ट्विटरवरून ताज हॉटेल येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा कऱण्याचे निमंत्रण

गतवर्षीच्या रायगड जिल्ह्यातील माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना इर्शाळवाडी येथे आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या ठाकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या दरड खाली अनेक घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवातहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू मुख्यमंत्री घटनास्थळावर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, इर्शाळवाडी दुर्घटनेची सविस्तर माहिती ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडीवर रात्री झोपेत असलेल्या आदिवासांच्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला. गतवर्षी रायगड जिल्ह्यातीलच माळीण येथे अशीच दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसानंतर गावात दरड कोसळल्याची ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. या …

Read More »

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची घोषणा

मीरा भाईंदर येथील जनतानगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (बीएसयूपी) मोफत सदनिका देण्यात आल्या होत्या. यात काही लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून त्या सदनिका ताब्यात घेतली जातील आणि याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »