मुंबई

राणा दाम्पत्याला तुर्तास दिलासा नाही, बुधवार पर्यंत तुरुंगातच वेळ संपत आल्याने न्यायालयाने सांगितले बुधवारी निर्णय देणार

मागील १० दिवसांपासून हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे तुरुंगात आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आजही न्यायालयालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी बुधवारी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळू शकला नाही. गेल्या …

Read More »

सरकारी वकील अॅड. घरत म्हणाले, राणा दाम्पत्य बाहेर आले तर परिस्थिती बिघडेल न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्या घरासमोर जाऊन म्हणण्याचा हट्ट धरल्याने पोलिसांनी राणा दांम्पत्यांवर राजद्रोहासह दोन गटात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जवळपास मागील आठवड्याभरापासून राणा दांमत्य पोलिस कोठडीत आहेत. सदरप्रकरणी जामीन मिळावा यासाठी त्यांनी …

Read More »

“झोपडपट्टी सुधार”णेच्या नावाखाली विकासासाठी “मंडळ” हद्द वाढविण्याचा घाट गृहनिर्माण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली

मुंबई शहरातील वाढत्या झोपडपट्यांच्या पार्श्वभूमीवर या झोपडीधारकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना १९९२ साली राज्य सरकारने केली. मात्र या मागील ३० वर्षात या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या कारभाराच्या रसभरीत कहाण्या अद्यापही ऐकायला मिळत असतात. आता विकासाच्या नावाखाली रसाळ गोमट्या कहाण्या निर्माण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील एका …

Read More »

मुंबईकरांना दिलासाः एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट पण नोटीफिकेशन काढल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईकरांना गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम, चर्चगेट ते डहाणू आणि कसारा कर्जत आणि पनवेल दरम्यान सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे मुंबईकरांकडून टाळले जात होते. तसेच या लोकलचे तिकिट दरही …

Read More »

मंत्र्यांच्या, सचिवांच्या आदेशानंतरही अन्न व नागरी पुरवठा विभागात पदोन्नत्या नाहीच मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना करणार तक्रार

कोरोना काळात राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील रेशनिगशी संबधित कर्मचाऱ्यांनी नागरीकांची उपासमार होवू नये या दृष्टीकोनातून चांगले काम केले. मात्र या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती देण्याच्या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आदेश दिले. त्यास सहा महिन्याहून अधिक काळ लोटला तरी विभागाच्या नियंत्रकाकडून पदोन्नतीचे …

Read More »

सोमय्यांची मागणी, हल्ल्यांची सीबीआय चौकशी करा किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

मागील आठवड्याच्या शेवटी अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात जावून येताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून व्हनवुटीजवळ किंचिंत खरचटल्याने थोडेसे रक्त आले. मात्र त्यावर शिवसेना भाजपामध्ये …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय वैद्यकीय कारणास्तव सर्जरी करण्यासाठी केला पीएलएमए न्यायालयात जामीन अर्ज

२० वर्षापूर्वी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारात अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या लोकांचे संबध उघड झाल्याने सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळावा यासाठी पीएलएमए न्यायालयात अर्ज केला. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबॅसिस कार्पस याचिका दाखल करत …

Read More »

अखेर गुणरत्न सदावर्ते यांना १८ दिवसांनी जामीन मंजूर मुंबई उच्च न्यायालयाने दिला २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लाबोल आंदोलनप्रकरणी मागे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यातील अनेक शहरात सदावर्ते यांच्या विरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मागील १८ दिवसांपासून सदावर्ते हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास सुरु …

Read More »

उच्च न्यायालयाने सांगितले, करमुसे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नाही आव्हाडांना मिळाला दिलासा

कोरोना काळात फेसबुकवर नकारात्मक पध्दतीने टिपण्णी केल्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसे यांना त्यांच्या घरातून उचलून आणून स्वतःच्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. तसेच याप्रकरणात आव्हाड यांना पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान सदरचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी …

Read More »

“सत्तेबरोबर जबाबदारीही येते” असे सांगत न्यायालयाने राणा दांम्पत्याची याचिका फेटाळली देशद्रोहाचा गुन्हा वेगळा राहणार

हनुमान चालिसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थानासमोर म्हणण्याचे आव्हान देत सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करत दोन गटांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यासोबतच दुसरा गुन्हा समाविष्ट करावा अशी मागणी करणारी राणा दांम्पत्याची याचिका आज उच्च न्यायालयाने रद्दबातल करत मोठी सत्ता मोठी जबाबदारीही आणते, त्यामुळे दोघेही राजकारणात …

Read More »