मुंबईः प्रतिनिधी कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा सवाल करत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी करावी अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली …
Read More »“त्या” युवकांचे ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख पुरस्कार देऊन गौरव करणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे …
Read More »पनवेलकरांसाठी खुषखबर: रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे
मुंबई : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे कल्पिता पिंपळे यांनी केली ही मागणी चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
ठाणे : प्रतिनिधी अनधिकृत फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सध्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन केला, त्यावेळी कल्पिता पिंपळे यांनी हल्लेखोरास कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ताई, तुमच्या बहादुरीचे …
Read More »राज ठाकरेंनी दिला पिंपळे यांना धीर, लवकर बऱ्या व्हा, बाकी (फेरीवाल्यांचे) आम्ही पाहतो ज्युपिटर रूग्णालयात जावून पिंपळे यांची केली विचारपूस
ठाणे: प्रतिनिधी अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजित यादव याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या. सहाय्यक आयुक्त कल्पना पिंपले यांच्यावर येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रूग्णालयात जावून विचारपूस केली, यावेळी राज यांनी तुम्ही लवकर बऱ्या व्हा, …
Read More »आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मुलुंड शासकीय आयटीआय आणि आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार
मुंबई : प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फुड …
Read More »रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त …
Read More »बीडीडी चाळकऱ्यांसाठी खुषखबर: पुनर्विकसीत सदनिका घेताना फक्त हजार रूपये भरा नाम मात्र मुद्रांक शुल्क आकरण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी ऐन शहरातील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडीमधील बीडीडीच्या २०७ चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास झालेल्या सदनिका पुन्हा मुळ चाळकऱ्यांना देताना फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे फक्त एक हजार रूपयात ही ५०० चौरस फुटाची सदनिका मुळ चाळकऱ्यांना …
Read More »मॉलमध्येही आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना मिळणार रात्री १० वाजेपर्यत असा प्रवेश #BreakTheChain अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई: प्रतिनिधी अखेर राज्य सरकारने मॉल्सनाही रात्री १० वाजेपर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली असून १८ वर्षा खालील मुला-मुलींचे अद्याप लसीकरण सुरु झालेले नसल्याने त्यांना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा …
Read More »लोकल प्रवासासाठी लसप्रमाणपत्राची पडताळणी करायचीय, मग या सोप्या गोष्टी करा मुंबई महापालिकेने कडून १०९ स्थानकांवर केली ऑफलाईन तपासणी सुविधा
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार ११ ऑगस्ट २०२१ …
Read More »
Marathi e-Batmya