राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …
Read More »परिवहन विभागाचे आवाहन, बनावट वेबसाइट्स, अॅप, खोट्या ई-चालान पासून सावध राहा फसवणूकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाचे आवाहन
राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. परिवहन …
Read More »वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत उपस्थित केला मुंबईतील हवा प्रदुषणाचा प्रश्न मुंबईतील हवा प्रदुषण अत्यंत घातक, श्वसनाचे आजार वाढले, तातडीने उपाययोजना करा..
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व जागतिक कीर्तीचे शहर आहे. आज मुंबईत हवा प्रदुषणाने उच्चांक गाठला असून श्वसनाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत AQI १५० ते २०० पर्यंत आहे तर काही भागात तो ३०० आहे. विषारी वायुच वाढलेलं हे प्रमाण मुंबईकरांसाठी मोठे संकट बनले आहे. मुंबईकरांना स्वच्छ हवा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारच्या काळातच दलित, वंचित व महिलांवर अत्याचार वाढले मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही
केंद्रात व राज्यात मनुवादी विचाराचे सरकार आल्यापासून दलित, मागास समाजावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत.ऑनर किलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. सरकारकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही. भाजपा सरकार जाणीव …
Read More »डिसेंबर अखेर महामेट्रो मिरा -भाईंदर करांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन २००९ मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते …
Read More »तुकाराम मुंढे यांची माहिती ‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट
दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणे, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये …
Read More »रामदास आठवले यांचे निर्देश, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवा ६९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित बैठकीत दिले निर्देश
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रीय …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा पीएपीPAP घोटाळा मालाड पूर्वला ८.७१ लाख चौरस फुटाचा ५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा
भाजपा महायुती सरकारने मुंबईत एक नवीन बिझनेस मॉडेल उदयास आणले असून यातून ‘लाडक्या बिल्डरांचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा करण्यात आला आहे. मालाड पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या डोंगराळ भागात ८.७१ लाख चौरस फुटाच्या भूखंडाचा महाघोटाळा केला असून हा मालाड पीएपी PAP घोटाळा तब्बल …
Read More »स्टुडिओत १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस गोळीबरात मृत्यू पवई भागात रोहित आर्य नावाच्या एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवले
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येते होते. उपचारा दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर …
Read More »
Marathi e-Batmya