मुंबई

मानवी हक्क आयोगाच्या आदेशानंतर कफ परेड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टी धारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. डॉ. आंबेडकर नगर  येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई …

Read More »

पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम चौधरी यांचे निधन वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त देवराम नामदेव चौधरी (वय ९२) यांचे नुकतेच (३० ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त सहआयुक्त सुहास चौधरी यांचे ते वडील होत. त्यांच्याचकडे चौधरी मुंबई येथे राहत असत. स्थानिक स्वराज्य …

Read More »

आता घरबसल्या घ्या सिध्दीविनायकाच दर्शन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धी विनायक मंदिराच्या ॲपचे उद्घाटन

मुंबई: प्रतिनिधी सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. या कार्यक्रमाला सिद्धीविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲङ पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी …

Read More »

सरकार देणार मच्छिमारांना १० ते ३० हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …

Read More »

मुंबई महानगरातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR Region) ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या प्राधिकरणाचे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (MMR-SRA) चे मुख्यालय ठाणे …

Read More »

महाडमधील त्या इमारतीतील ७८ व्यक्ती सुखरूप तर मृतकांची संख्या १० वर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

महाड: प्रतिनिधी येथील तारिक गार्डन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९७ व्यक्तींपैकी ७८ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून ते सुखरूप आहेत. या दुर्घटनेत संध्याकाळपर्यत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, …

Read More »

गणेश विसर्जन करायचाय ? मग पालिकेच्या फिरता कृत्रिम तलावात करा मुख्यमंत्री ठाकरेंकडून पाहणी आणि कौतुक

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.  तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन …

Read More »

बदलीचा अन्यायकारक तो शासन निर्णय रद्द करा मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी मुंबई शिधावाटप कर्मचारी संघनेने एका पत्राद्वारे केली. या निर्णयामुळे मुंबईत नोकरीस असलेल्यांचे आई-वडील गावाकडे किंवा त्यांची घरे ही गावाकडे असतात. जर त्यांची बदली जिल्हास्तरावर झाली तर त्यांना आईवडीलांबरोबरच स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ …

Read More »

सार्वजनिक उत्सवावर नऊ तपासणी पथकांची राहणार नजर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पथकांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. उच्च …

Read More »

वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्यावतीेने लोकमान्य टिळकांचा चिखलीतील वाडा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून यावर्षी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्याची २५ वर्षांची परंपरा अखंडित ठेवण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरी चिखली येथील वाड्याची हुबेहुब प्रतिकृती आरास म्हणून मंडळाने साकारली …

Read More »