मुंबई

१९ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढविला ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी ठाणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी २ ते १२ तारखेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र या कालावधीतही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १२ तारखेपासून १९ जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला असून यासंदर्भातील आज आदेशही जारी केले. मागील काही दिवसांपासून …

Read More »

SRA धोरणात २०१६ च्या चूकांची गृहनिर्माण विभागाकडून पुर्नरावृत्ती परिशिष्ट-२ चा निर्णय पुन्हा घ्यावे लागण्याची शक्यता

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईतील SRA अर्थात झोपडपट्टी पुर्नवसन योजनेतंर्गत झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसन प्रकल्पाला गती मिळावी यासाठी विद्यमान गृहनिर्माण विभागाने नुकतीच नवी कार्यप्रणाली जाहीर केली. मात्र या कार्यप्रणालीत २०१६ साली तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केलेल्या चुकांची पुर्नरावृत्तीच होत असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरातील बहुतांष झोपड्यांना या शासकिय, …

Read More »

ठाणे, पनवेलकरांसाठी खुषखबर: पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्ग होणार विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

मुंबई: प्रतिनिधी ठाण्याहून पनवेल आणि कर्जत, तसेच ऐरोलीला जाणाऱ्या उपनगरीय प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गाड्या आणि मार्गाची उपलब्धततेमुळे या सध्याच्या मार्गावरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान आणि ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन बरोबर सिडको …

Read More »

कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होतेय : नागरिक, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करा मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा- मुख्यमंत्री

मुंबई: प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका , आपापल्या शहरांतील नागरिकांना , स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. त्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक …

Read More »

“राजगृहाचा” अवमान करणाऱ्यांची गय नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत समाजकंटकांना इशारा दिला. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण …

Read More »

क्रॉस चेकिंग, विभागीय चौकश्या सुरु केल्याने शिधावाटप कर्मचारी जाणार संपावर कर्मचारी संघटनेचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यंत्रणेअंतर्गत मुंबई, ठाणे विभागात पात्र लाभार्थी यांचेपर्यंत शासनामार्फत पुरविल्या जात असलेल्या अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी जिद्दीने पार पाडत आहेत. तरीही एका कार्यालयातून दुस-या कार्यालयातील कार्यक्षेत्रात जाऊन तपासण्या करण्याचे आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालकाकडून देण्यात आले आहेत. यापरिस्थिती अशा तपासण्या …

Read More »

आपतकालीन परिस्थितीतही रेशनिंग दुकानदारांकडून काळाबाजार गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई- नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून गैरप्रकार करणाऱ्या २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा …

Read More »

दोन दिवसातच मुंबई पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्या रद्द पुन्हा मुळ जागी हजर राहण्याचे आदेश मुंबई सहपोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरातील उपायुक्तांच्या बदल्यांचे ३ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. मात्र आज अचानक ३ जुलै रोजी काढण्यात आलेले बदल्यांचे आदेश आज रद्द करण्यात आल्याचे पोलिस विभागाकडून जाहीर करत बदली झालेल्या सर्वांना आपल्या पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त होण्याचे आदेश बजाविण्यात आले आहे. यासंदर्भात गृहविभागाशी संपर्क जाणून घेण्याशी प्रयत्न …

Read More »

पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …

Read More »

मुंबईत १७ हजार जागांसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन मेळावे एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार जागापैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …

Read More »