मुंबई : प्रतिनिधी ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी येथे एईएसआयच्या (एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई शाखेद्वारे आणि टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनद्वारे विमान सुरक्षा उपकरणाच्या डेमोचे आयोजन करण्यात आले होते. विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ सह सेमीनारचे उद्घाटन टीआयएटीचे वरिष्ठ प्रशिक्षक आणि एईएसआयच्या मुंबई शाखेचे मा. संयुक्त सचिव विवेक कुलकर्णी यांनी केले …
Read More »मंत्रालयाच्या दारात महिलेचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ महिलेकडून पाऊल
लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या आणि सय्यद मोहम्मद अन्सारी हा त्रास देत असल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला. …
Read More »अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना
नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …
Read More »घाटकोपरमध्ये विमान कोसळून ५ ठार मुंबईत पहिल्यांदाच नागरी भागात विमान कोसळण्याची घटना
मुंबई : प्रतिनिधी आज दुपारी १.१८ मिनिटांनी घाटकोपर परिसरातील सर्वोदय नगर भागात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या विमान अपघातात पायलटसह ५ जण ठार झाल्याची घटना घडली. जुहू हेलिपँडवरून हे विमान चाचणीच्या उद्देशाने निघाले होते. तेव्हा विमानात बिघाड झाल्याने जीवदया लेन इथल्या इमारतीचे बाधकाम सुरु असलेल्या परिसरात हे विमान कोसळले. या अपघातात …
Read More »झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार लवकरच एसआरएकडे नवी नियमावली अंतिम टप्प्यात
मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानीला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या एसआरए योजनेतील झोपडीधारकाच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार पुन्हा एसआरएकडेच वर्ग करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाकडून नवी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. एसआरए योजनेसाठी झोपडीधारकांना पात्र-अपात्र ठरविण्याच्या …
Read More »मुंबई महापालिकेच्या विकास आराखाड्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप चिंताजनक शिवसेना मंत्र्यासह खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना दुबळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हरकती आणि सूचनांसाठी विकास आराखडा मराठीतून उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते,पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री …
Read More »मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कर्मचाऱ्यांना सामावून घ्या तीन महिन्यात सामावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७०० सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत, त्या कामगारांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »पहिल्याच मुसळधार पावसात मंत्रालय लागले गळायला राज्य सरकारच्या व्यवस्थेचा उडाला बोजवारा
मुंबई : प्रतिनिधी पुढील सहा ते सात दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार आज गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवातीलाच मंत्रालयातील अँनेक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावर पावसाने छत कोसळून गळती लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. अँनेक्स इमारतीच्या ७ व्या …
Read More »पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी आपतकालीन यंत्रणा सज्ज अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपुर्व तयारी बाबत …
Read More »मॉन्सून काळात मेट्रोच्या कामाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होणार नाही मुंबई मेट्रोचा दावा : नियंत्रण कक्षाची स्थापना करणार
मुंबई: प्रतिनिधी मान्सून काळात मुंबई महानगर पालिकेच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मॉन्सूनची कामे करण्यास कंत्राटदारांना मुंमरेकॉने अर्थात मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने सूचना दिल्या आहेत. पर्जन्य जल वाहिन्याची सफाई कामे, पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याची कामे, पूरप्रवण भागात सिडीमेन्टेशन टाक्या बांधणे, पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपाची व्यवस्था करणे इत्यादी कामे कॉर्पोरेशनद्वारे पूर्ण झाली असून काही ठिकाणी …
Read More »
Marathi e-Batmya