Breaking News

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षाकडूनही आता विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर आज मनसेच्या पादधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, समाजामध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावे, कारण यातून काहींना मते हाती लागतील, परंतु राज्यात खून खराबे सुरु होऊ शकतात, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.

पक्षाच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हणाले की, मनसे पक्षाची आज झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या असून त्यांना विधानसभांचे अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पक्ष्याच्या बैठकीत पक्षांतर्गत विषयावर करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांना कामे नेमून देण्यात आली आहेत. त्यातील काहींना विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने अहवाल तयार करण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘जातीपातीच्या राजकारणाने समाजात काहीही होत नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेश पसरवून फक्त मते घेतात. जनता त्यांना भोळसटपणे हे मते देतात. पण याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवर होणार आहे. हे जातीपातीचे राजकारण शाळा, कॉलेजपर्यंत जाणार आहे. हे विष महाराष्ट्रात यापूर्वी कधीही नव्हते. जातीपातीचे विष कालवणारी लोक आहेत. म्हणून महाराष्ट्राने यांना दूर ठेवले पाहिजे. कितीही आवडता नेता किंवा आवडता पक्ष असला तरीसुद्धा असले विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांचे काय होणार? महाराष्ट्राचे काय होणार?, असा सवालही यावेळी उपस्थित केला.
शेवटी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जाती पातीच्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या लवकरच महाराष्ट्रात सुरु होतील. त्यानून खून-खराबे सुरू होतील,” असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

दिल्ली आणि चेन्नईच्या तुलनेत मुंबई शहरात राहणे सर्वाधिक महाग एचआर कन्सल्टन्सी मर्सरचा रिपोर्ट

एचआर कन्सल्टन्सी मर्सरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताची आर्थिक राजधानी मुंबई अजूनही प्रवासींसाठी देशातील सर्वात महागडे शहर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *