तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले. तर तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर – ५५.३८ टक्के

सांगली – ५२.५६ टक्के

बारामती – ४५.६८ टक्के

हातकणंगले – ६२.१८ टक्के

कोल्हापूर – ६३.७१ टक्के

माढा – ५०.०० टक्के

उस्मानाबाद – ५२.७८ टक्के

रायगड – ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के

सातारा – ५४.११ टक्के

सोलापूर – ४९.१७ टक्के

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा कामांना अधिक गती देणार मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *