पुणे शहराचा विकास करताना शरद पवार यांनी जाणिवपूर्वक आयटी पार्कला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हिंजवडी परिसरात जागा देत पुणे शहराला आयटी हब मध्ये परावर्तित केले. परंतु हिंजवडीबरोबर आजूबाजूच्या भागात शहरीकरण आणि लोकवस्ती वाढली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील कामे मार्गी लावण्याचे आदेश पुण्याचे पालकमत्री अजित पवार यांनी प्रशासनाना दिले. त्याची पाहणी करण्यासाठी आजच सकाळीच अजित पवार कामे किती झाली, मार्गी लागली का याची पाहणी करण्यासाठी सकाळी ६ वाजताच हिंजवडी परिसरातून दौरा करत होते.
तसेच रस्त्यावर उतरून अजित पवार विविध ठिकाणांची पाहणी करत होते. यावेळी हिंजवडीच्या क्रोमा चौकातून त्यांनी दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना अजित पवार यांनी चांगलंच सुणावल्याचं पाह्यला मिळालं.
आज पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. pic.twitter.com/g4yEaG2hIk
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2025
यावेळी अजित पवार यांच्याकडे या परिसरातील मंदिर न पाडण्याबाबत आग्रह धरत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, धरणं बांधताना मंदिर जातातच, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं सगळं आयटी पार्क पुण्यातून बाहेर जात आहे. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला सकाळी सहाला आलो आहे. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं सांगत चांगलंच खडसावलं.
Marathi e-Batmya