महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाणाऱ्या एका जागेकरीता अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात असताना मात्र महायुतीचे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांपैकी एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता.
राज्यसभा खासदार असलेल्या प्रफुल पटेल यांनी त्यांच्या पदाची आणखी साडेचार वर्षे शिल्लक असताना यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी पुन्हा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करत महायुतीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडूण आले. त्यामुळे पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेकरीता सध्या ही निवडणूक पार पडत आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर लगेच दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आदी नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, या रिक्त जागेसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकमधून लोकसभआ निवडणूक लढविण्यासाठी छगन भुजबळ हे इच्छुक होते. मात्र छगन भुजबळ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसऱ्याबाजूला राज्यातील महायुतीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी उपस्थित नव्हते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली खरी. मात्र त्या जागेवर मिळवता आला नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपा श्रेष्ठी भलतेच नाराज झाल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे भाजपाला फायदा न होणाऱ्यांना दूर लोटा असे स्पष्ट शब्दात राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. त्यामुळे महायुतीचे नेते सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी जाणाीवपूर्वीक गैरहजर राहिल्याचे बोलले जात आहे.
Marathi e-Batmya