… आणि मुख्यमंत्री संतापले, अन काही तासात समस्या सुटली बेसा वसतिगृहात पोहोचले कुलर

आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करतायेत. ह्या एका फोन कॉल नंतर विदर्भातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आवाजात प्रचंड संताप होता. समोर शांतता होती. अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या एका फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली. ज्या तांत्रिक अडचणी अनेक दिवस सुटत नव्हत्या, त्या काही तासांत सुटल्या आणि बेसा वसतिगृहात कूलर पोहोचले.

सदर घटना आहे नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहाची. विदर्भाचा उन्हाळा काय असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. तापमान ४० ते ४५ अंशांवर पोहोचलेलं. बाहेर अंगाची लाही लाही करणारी गरमी आणि आत वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अक्षरशः भट्टीसारखी परिस्थिती. त्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुली घरापासून दूर राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या, तर काही कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथे राहत होत्या. स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वप्न घेऊन आल्या होत्या. पण त्यांच्या समोर उकाडा सर्वात मोठा प्रश्न होता.रात्रभर झोप नाही, अस्वस्थपणा, काही मुलींना त्वचेचे त्रास सुरू झाले होते. कृपया कूलर लावून द्या ही विनंती वारंवार करूनही त्यांना प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं की तांत्रिक अडचणी आहेत. दिवसामागून दिवस गेले. त्रास वाढत होता. पण विचारलं तर उत्तर तेच. शेवटी ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यां मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. विषय समजताच मुख्यमंत्री अक्षरशः संतापले. अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत जाब विचारला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर दौऱ्यावर असताना हॉस्टेलमधील मुलींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विदर्भात तापमान ४५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे वसतिगृहातील मुलींना त्रास सहन करावा लागत होता, मुलींनी अधिकाऱ्यांकडे कुलरची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. यानंतर हा मुद्दा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये हा प्रश्न मार्गी लावला.

आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करतायेत. ह्या एका फोन कॉल नंतर विदर्भातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली. अनेक दिवस त्या तांत्रिक समस्या सुटत नव्हत्या, त्या काही तासांत सुटल्या आणि बेसा वसतिगृहात कूलर पोहोचले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचार केला की, ही समस्या फक्त एका वसतिगृहापुरती मर्यादित कशी असणार ? त्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि एक-दोन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सरकारी वसतिगृहांसाठी कूलर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे सुटल्यामुळे त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. काही मुलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली, तर काही मुलींनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी विचार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवा महात्मा फुले व्दिशताब्दी जयंती निमित्त ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रम टिळक भवनमध्ये संपन्न.

ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *