सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच अमित शाह यांच्याकडून निर्णय जाहिर… शेगांवमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह यांनी जाहिर केला

साधारणतः ३ वर्षापूर्वी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणि ईडी आणि सीबीआयच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एका शिवसेनेचे दोन शिवसेनेत निर्मिती केली. तर दोन वर्षापूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीत निर्माणातही मोठा हातभार लावला. या चार पैकी दोन नेमके खरे पक्ष कोणते यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून या बाबत अद्याप स्पष्ट निर्णय घेतला गेला नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील चार पक्षांपैकी दोन खरे कोणते पक्ष याचा निर्णय आज जाहिर केला.

वास्तविक पाहता शिवसेना पक्ष विधिमंडळातील पक्ष खरा की जो विधिमंडळाच्या बाहेर कार्यकर्त्यांच्या बळावर चालविला जातो तो खरा याबाबतचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून त्याबाबतचा निर्णय अद्याप दिलेला नसला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने तो पर्यंत या दोन्ही गटांना मान्यता दिली.

त्याचबरोबर तीच गत शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांसह भाजपाच्या वळचनीला गेली. त्यामुळे एक गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी राष्ट्रवादीची भाजपाच्या मदतीने विभागणी झाली. याही दोन गटापैकी खरा गट कोणता याविषयीची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या दोन्ही राजकिय पक्षांच्या चार पैकी दोन पक्ष कोणते खरे याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार याची उत्सुकता आजपर्यंत आहे. त्यातच भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाला येण्याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यातील नेमका खरा पक्ष कोणता याचा निकाल जाहिर केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगांव येथे आज पार पडत आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खास आवर्जूनपणे उपस्थित राहिले. यावेळी बोलताना अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच निकाल जाहिर करत अजित पवार यांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल जाहिर केला.

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *