अमित शाह यांच्या दौऱ्याआधी भामरागड येथे स्फोट नक्षलवादाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आल्याच्या घोषणेला सुरुंग

मागील काही महिन्यांपासून देशातील नक्षलवाजाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्यात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. त्यामुळे शहरी भागात असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा भाजपाकडून सुरु करण्यात येत आला होता. मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच भामरागड, गडचिरोलीत निवडणूक प्रचारासाठी जाणार होते. परंतु तत्पूर्वीच येथील नदीच्या पुलाचे काम सुरु असून या नव्या पुलाजवळच स्फोट झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

छत्तीसगडला लागून असलेल्या नक्षलप्रभावित भामरागड भागातील पर्लकोटा नदी जवळ हा स्फोट झाल्याची माहिती आज सकाळी उघडकीस आली. उद्या अमित शाह निवडणूक प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिलेला असल्याने हा नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

आलापल्ली, भामरागड रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच भामरागड येथील पर्लकोटा नदी जवळ नव्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलाच्या शेजारी रात्री मोठा आवाज झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या जीवितहानी टळली आहे. सकाळी या भागाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याच्या रेषा ओढलेल्या दिसून आल्या. त्यामुळे या भागात पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सध्या सुरु आहे.

आतापर्यंतच्या घटनामधून एक माहिती पुढे आली असून नक्षलवाद्यांकडून जमिन स्फोटक पुरली जातात आणि नंतर त्याचा स्फोट घडवून आणला जातो. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका नको म्हणून पोलिसांनी या परिसर पिंजून काढला आहे. बॉम्बस्फोट पथक आणि श्वान पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे.

मागील काही दिवसात पोलिस यंत्रणेने नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु केल्याने नक्षलवादी मागे हटले होते. मात्र अधून मधून नक्षलवाद्यांकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात. नक्षलवाद्यांच्या या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेला एक प्रकारे आव्हान निर्माण झाले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *