नाराज आमदारांशी मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड चर्चा

शिवसेनेशी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचून एकनाथ शिंदे यांनी राज्यात वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी रोज कोणी ना कोणी ना कोणी या ना त्या कारणास्तव नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत आहेत. त्यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बंद दाराआड चर्चा केली असल्याची माहिती पुढे येवू लागली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी राज्यातील सरकार लवकरच कोसळेल असे वक्तव्य केल्याने अशा चर्चांना अधिकच उधाण आले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. त्या नाराजांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे समर्थक आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे शिंदे सरकारवर कमालीचे नाराज होते, तसेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पहिल्या फेरीत शिवसेनेचा त्याग करून सोबत गेलेल्या अनेकांना अद्यापही मंत्री पद मिळालेले नाही. त्याची चर्चाही हे आमदार सातत्याने करत आहेत. यावरून सरकारच्या अस्थिरतेचा सवाल उपस्थित केला जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची नाराजी तर लपून राहीलेली नाही आपल्यापेक्षा कनिष्ठ आमदाराला मंत्री पद मिळते. मात्र आम्ही मात्र अजूनही वंचित आहोत अशी नाराजी त्यांनी जाहिरपणे उघडपणे केली होती. आता या आमदारांनी नाराज नसल्याचे सांगितले असले तरी पुन्हा एकदा शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते.

त्यातच आता दादाजी भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. मात्र त्यांच्या कार्यपध्दतीवरून आता नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते. या सगळ्या आमदारांची नाराजी पाहता शिंदे गटात सब गोलमाल है भाई गोलमाल है असे बोलले जात आहे.

सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री आणि कांदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते. मात्र नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. तरी नाराज आमदारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *