पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे नाव घेतले, तसेच शिवाजी महाराज हे जून्या काळातील आदर्श होते, अशी विधाने करत मुंबईच्या उभारणीत बिगर मराठी लोकांचे योगदान जास्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी राज्यातील भाजपाने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही. इतकेच नव्हे तर महात्मा फुले सावित्री फुले यांच्याबद्दलही वेगळ्या पद्धतीने आपले मत व्यक्त केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील भाजपाकडून चकार शब्द काढला नव्हता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांच्या समकक्ष राहिलेले म्हैसूरचे राजे टीपू सुलतान यांचेही काम ब्रिटीशांच्या विरोधात होते. त्यामुळे टीपू सुलतान यांचेही काम देशासाठी होते असे वक्तव्य केले. परंतु भाजपाचा मुस्लिम नावाला असलेल्या विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तातडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात करत त्यांच्यावर टीकेची झोड भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु केली.

पुण्यात भाजपाचे कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या वेळी दगडफेक, बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला. यामध्ये अनेक गाड्यांच मोठं नुकसान झालं. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यातील भाजपाचे गुंड, काँग्रेस कार्यालयावर चाल करून आले, भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. मात्र यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्त्ये आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांच मोठ नुकसान झाले. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाल्याचीही माहिती समोर आली.

यासंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ध चा मा करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज मला पुण्यात आला. पुण्यातील भाजपाचे गुंड, पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपाच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *