निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश

राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. त्या पाठोपाठ शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूकीपूर्वीच काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय जमा झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती राज्यातील निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम यांना दिली. एस चोकलिंगम यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना कळवित या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकाचे पदवरून तात्काळ हटविण्यात येत त्याचा पदभार ज्येष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या कडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. याशिवाय ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचे आदेशही यावेळी दिले.

हे ही वाचा

नाना पटोले यांचे आयोगाला पुन्हा पत्र, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना का हटवत नाही?

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या नागपूरच्या पोलिस आयुक्त असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी काही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांचे फोन टॅप केले. त्याचबरोबर काही अपक्ष आमदारांवर दबाव आणण्यात आल्याची चर्चा त्यावेळी उघडकीस आली होती. तसेच रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टॅप केलेले फोनचा अहवाल फोडून तो भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविला होता. त्यावरून महाविकास आघाडी सरकारने रश्मी शुक्ला यांची महाविकास आघाडीने चौकशी लावण्याची घोषणा केली. मात्र तत्पूर्वीच केंद्राने रश्मी शुक्ला यांची बदली हैद्राबादला करून टाकली. राज्यात पुन्हा भाजपा प्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात मुंबईत पोलिस संचालक म्हणून आणून बसविण्यात आले. तसेच महाविकास आघाडी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व गुन्हे रद्द करण्यात आले.

त्यामुळे विधानसभा निवडणूका सुरळीत- पारदर्शक पद्धतीने व्हायच्या असतील तर रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन ते तीन वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनीही हीच मागणी केली. अखेर काँग्रेस शिवसेना उबाठा पक्षाच्या मागणीनुसार रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय जमा झाल्याचे बोलले जात आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *