नाना पटोले म्हणाले, …राजा कोण? याचे उत्तर जनतेने निवडणुकीतून दिले विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करु

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला. तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा कोण?’ याचे उत्तर जनतेने दिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याबद्दल काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. नागपूर हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा बालेकिल्ला आहे, पण याच बालेकिल्ल्यात काँग्रेसने मागील वर्षी पदवीधरच्या निवडणुकीत पराभूत केले, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाची धूळ चारली. विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेस विचाराची राहिली आहे. विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करेल. भाजपाने या निवडणुकीत सर्व काही ठरवून केले, सत्तेचा दुरुपयोग केला. जो जिंकला तो आपला अशी भाजपाची भूमिका आहे.

नाशिकमध्ये काँग्रेसचे घर फोडण्याचे पाप भाजपाने केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही. नाशिकमध्ये सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला, सत्यजीत तांबेला उमेदवारी द्या असे त्यांनी सांगितले असते तर आम्ही उमेदवारी दिली असती. डॉ. सुधीर तांबे यांनी फार्म भरताना घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप आहे. नाशिकच्या संदर्भात हायकमांडच निर्णय घेईल, असेही नाना पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *