विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून रात्री उशीरा १६ उमेदवारांची यादी जाहिर केली. या उमेदवारी यादीत माजी मंत्री तथा आमदार माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पहिल्यांदा अंधेरीतून उमेदवारी जाहिर करण्यात आली. याशिवाय असिफ झकेरीया, दिलीपकुमार सानंदा यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर आणि मित्र पक्षांना देण्यात आलेल्या विधानसभेच्या जागानंतर काँग्रेस पक्षाकडून विधानसभा पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली. दुपारी काँग्रेसने १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली होती. त्यानंतर लगेच आज रात्री उशीराने तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाकडून जवळपास हिश्याला आलेल्या ८३ उमेदवारांना उमेदवारी जाहिर करत उमेदवारी अर्जासोबत द्यावयाचे एबी फॉर्मचे वाटपही केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही आज १५ उमेदवारांची यादी जाहिर करत उर्वरित जागांवरील उमेदवार आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहिर केले जातील असे प्रदेशाक्ष्यक्ष जयंत पाटील यांनी आज जाहिर केले.
काँग्रेसकडून मात्र अत्यंत धीम्या गतीने उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक यादीवर दिल्लीतील पक्षनेतृत्वाची मान्यताही घेण्यात येत आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या यादीला उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रात्री उशीराने जाहिर झालेल्या विधानसभा उमेदवारांच्या यादीत माणिकराव ठाकरे, दिलीपकुमार सानंदा वगळता अनेक नव्या चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
तसेच मागील अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात काँग्रेसची मुद्देसुद बाजू आणि भाजपा आणि भाजपा सरकारची पोलखोल करण्यात नेहमीच आघाडीवर असलेले सचिन सावंत यांनाही आज उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय आरिफ झकेरिया यांनाही पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी खालीलप्रमाणे
खामगावं- राणा दिलीपकुमार सानदा
मेळघाट अ.ज -डॉ हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली अ.ज-मनोहर तुळशीराम पोरेती
दिग्रस- माणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण- मोहनराव मारोतराव अंवाडे
देगलूर अ.जा.-निवृत्तीराव कोंडिबा कांबळे
मुखेड -हनमंतराव वेंकटराव पाटील बेतमोगरेकर
मालेगांव मध्य- ऐजाज बेग अजीज बेग
चांदवड- शिरीषकुमार वसंतराव कोतवाल
इगतपुरी अ.ज- लकीभाऊ भिका जाधव
भिवंडी पश्चिम- दयानंद मोतीराम चोरगे
अंधेरी – सचिन सावंत
वांद्रे पश्चिम-असीफ झकेरिया
तुळजापूर-कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर पूर्व- राजेश भारत लाटकर
सांगली-पृथ्वीराज गुलाबराव पाटील
Marathi e-Batmya