डॉ सुजय विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी… अन्नदान संस्थानने बंद करावे

भाजपाचे माजी खासदार तथा विद्यमान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी आज शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या अनुंगाने उद्देशाने संपूर्ण देशात सध्या फुकट जेवण वाटप केले जात आहे. त्यात आता महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ सुजय विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉ राधाकृष्ण विखे-पाटील यांनी होय हे वादग्रस्त वक्तव्य असल्याचे मत व्यक्त केले.

मात्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी माझ्या बोलण्याचा उद्देश शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना उद्देशून नसल्याचे दावा करत माझे वक्तव्य हे जे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या यादीनुसार जे भिखारी आहेत त्यांच्याबाबत होते अशी स्पष्टोक्ती देत स्वतःच्या वक्तव्याची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणूकीत डॉ सुजय विखे-पाटील यांच्या अशाच पद्धतीच्या वक्तव्यामुळे अहमदनगर मधील मतदारांनी डॉ सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर डॉ सुजय विखे-पाटील यांनी पुन्हा विधानसभा निवडणूकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडे तिकिट मागितले. मात्र भाजपाने डॉ सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्याचे टाळले.

मात्र त्यावेळीही डॉ सुजय विखे-पाटील यांनीही त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या आर्विभात बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात प्रचाराचा धडाकाही सुरु केला. तेव्हा बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत जिल्ह्याच्या राजकारणात आपण खालच्या स्तरावर घसरत असल्याचे दाखवून दिले.

मात्र डॉ सुजय विखे-पाटील यांना भाजपानेच उमेदवारी दिली नाही. त्यामुळे इथून पुढच्या दिवसातही भाजपाकडून अशा पद्धतीच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

भिकारी वक्तव्यांच्या बाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डॉ सुजय विखे पाटील यांना विचारले असता म्हणाले की, मी साईभक्तांवर बोलण्याचा प्रश्नच नाही. मी ज्यांच्याबद्दल बोललो ते तडीपार, भिकाऱ्याच्या वेशात येऊन आपली उपजिविका शिर्डीत सुरु ठेवत असल्याबाबत बोललो आहे. तसेच शासकिय स्तरावर भिकारी म्हणून जी व्याख्या करण्यात आली आहे त्या डेटाच्या आधारेच वक्तव्य केल्याची सारवा सारव केली.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *