मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणे, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे; तसेच प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातील कार्यालयात ९३२६५६२८१५ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न …
Read More »केशव उपाध्ये यांची माहिती, भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री सहभागी होणार
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये बोलत होते. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले
नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली. हवेली तालुक्यातील नदी तीरावरील शेतीला दूषित पाणी मिळत असल्यासंदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …
Read More »मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचा मोठा निर्णय, हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणीस मंजूरी मनोज जरांगे -पाटील यांच्या भेटीला जात मंत्रिमंडळ उपसमितीची माहिती
मागील चार दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागणीला अखेर राज्य सरकारने मंजूरी दिल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी ठरले असून संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये …
Read More »राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …
Read More »राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश, धरणातील गाळ काढण्यासंदर्भात धोरण करा जलसंपदा विभागाच्या प्रशासनाला आदेश
धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे याबाबतचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्वसमावेशक असे नवीन धोरण तयार करावे, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्रालयात धरणातील गाळ काढणेसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची सद्यस्थिती तसेच वाळू व माती विलगीकरणासंबंधित तंत्रज्ञांबाबत बैठक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य
औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग …
Read More »
Marathi e-Batmya