शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषीमंत्री भरणे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या कृषी मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज मंत्रालयात औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.
या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला.
“मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असून, शेती आणि शेतकऱ्यांचे हित हेच माझे सर्वोच्च प्राधान्य राहील.”मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री… pic.twitter.com/NhRpkv1TDD
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) August 5, 2025
Marathi e-Batmya