Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नॅरेटीव्ह, तर अजित पवार यांची ग्वाही उत्तरे आमच्याकडे विरोधकांच्या पत्रातील मुद्यावरून सरकारची तयारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सह्याद्री येथील चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत विरोधकांवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी लोकसभा निवडणूकी दरम्यान खोटे नॅरेटीव्ह तयार केले. त्या आधारावर त्यांनी मतेही जास्त मिळवली. मात्र विधानसभा निवडणूकीत याच गोष्टीची पुर्नरावृत्ती होईल या भ्रमात विरोधक असल्याची टीका केली.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी सरकारला लिहिलेल्या पत्रातील काही मुद्यांचा उल्लेख करत म्हणाले की, मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरात मध्ये कधी गेले आणि कसे गेले असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. विरोधक कदाचित विसरले असावेत की, मुंबईतील वित्तीय केंद्र गेले का तर गेले, मात्र ते कोणाचे सरकार असताना गेले याचा त्यांनी थोडासा अभ्यास केला असता तर या प्रश्नाचा उल्लेख त्यांना पत्रात करावा लागला नसता असे सांगत गुजरातला गेलेले वित्तीय केंद्र हे काँग्रेसचे सरकार असतानाच गुजरात गेल्याचा प्रत्यारोपही केला.

तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून आणि ड्रग्ज पार्ट्यावरून विरोधकांकडून सरकारकडून आरोप करण्यात येत आहे. मात्र मी एख सांगू इच्छितो की, पुणे येथे पोर्शे कार अपघात प्रकरणी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणातही कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे तेथेही कारवाई करण्यात येत आहे. मात्र अडीच वर्षे सत्तेत राहिलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बार मालकांकडून वसुली करायला लावलेल्या गृहमंत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते हे कदाचीत विरोधक विसरले असले असावेत असे सांगत मृत लोकांच्या टाळूवरील लोणी कोणी खालले, डेडबॉडी बँग्ज घोटाळा कोणी केला असे सवाल करत विरोधकांचे घोटाळेही बाहेर काढणार असल्याची घोषणाही यावेळी केली.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांकडून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मतीतील श्लोकाचा समावेश करणार असल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. मात्र मनुस्मृतीतील तसला एकही श्लोक शालेय पाठ्यपुस्तकात नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवून जातीत वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांवर करत पावसाळी अधिवेशनात सरकारकडे विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत आणि विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला अधिवेशना दरम्यान उत्तरे देऊ अशी ठाम भूमिकाही यावेळी जाहिर केली.

Check Also

लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *