Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, मराठा आरक्षणप्रश्नी तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी

मागील अनेक वर्षे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार राज्यात होते. तसेच त्यांनी सत्तेत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. मात्र आपले सरकार २०१४ साली सत्तेत आले आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आले आणि मराठा समाजाचे आऱक्षण गेले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाबाबात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

भाजपाच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलात आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला नुसतेच आरक्षण दिले नाही, तर ते न्यायालयात आम्ही टीकवलेही. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचं आऱक्षण टीकवताही आले नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही याबाबत या दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान देत यांच्या भूमिकेचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

मराठा आरक्षणाबाबत पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९८२ साली राज्यातील पहिला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर नरेंद्र पाटील यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली. मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे हे अण्णासाहेब पाटील होते. त्यावेळी मुख्यमंत्री पदी असलेले शरद पवार हे होते. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी सभागृहात सांगितले की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही म्हणून, पण या समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत अनेकांनी बलिदान दिल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मैदानात उतरण्याची गरज असून आता तुम्ही सर्वांनी मैदानात उतरावे पण अट एकच की हिट विकेट व्हायचे असे सांगत आदेश काय आहे हे मी सांगणार नाही, पण मैदानात उतरून ठोकून काढायचे असे आदेशही यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना फडणवीसांनी दिले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत आपल्या पेक्षा फक्त दोन लाख मते महाविकास आघाडीला पडली. त्यामुळे त्यांचे खासदार जास्त निवडूण आले. मात्र आम्ही जेव्हा राज्यातील महिला वर्गासाठी लाडकी बहिण योजना जाहिर केली. तेव्हा आघाडीला मिळालेली मतं पुन्हा आपल्याकडे आल्याचे सांगत आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत विजय आपलाच असून ही गेलेली दोन लाख मतं आपल्याला मिळवायची आहेत हे कधीही विसरू नका असे आवाहनही यावेळी केले.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून जे फेक नॅरेटीव्ह निर्माण करण्यात आलेले आहे त्या फेक नॅरेटीव्ह रूपी रावणाचा आपल्याला अंत करायचा आहे. त्यामुळे ज्या पध्दतीने विरोधकांनी आपल्या विरोधात तंत्रज्ञानाचा वापर करत फेक नॅरेटीव्ह निर्माण केले आहे त्याला आपल्याला त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे बदल्या परिस्थितीनुसार आपल्यालाही रणनीती आखावे लागणार असून दररोज फेक नॅरेटीव्हच्या विरोधात एक ट्विट जरी केले तरी फेक नॅरेटीव्हही उद्धवस्त करावे लागणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *